कारच्या धडकेत सायकलस्वार शेतकरी ठार
By admin | Published: July 16, 2016 11:47 PM
जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या कारने सायकलवर जाणार्या डिगंबर अंकित पाटील (वय ७० रा.विठ्ठलपेठ, जळगाव) यांना धडक दिल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ममुराबाद शिवारातील चांदेलचा मारोती मंदिराजवळ घडली. डिंगबर पाटील यांची ममुराबाद शिवारात शेती आहे. शेतीच्या कामासाठी ते रोज सायकलने जातात. शनिवारी काम आटोपल्यानंतर ते घरी येत असताना कारचा(एम.एच.१९ बी.यु.१०१०) त्यांना कट लागला. डोक्याला मार लागल्यामुळे कारचालक श्रीराम धनसिंग कोळी (रा.जळगाव) व त्याच्यासोबत असलेल्या सहकार्याने त्यांनी जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना एक तासाने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालक कोळी याच्याविरुध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक सागर शिंपी करीत आहेत. अपघातातील कार ही
जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या कारने सायकलवर जाणार्या डिगंबर अंकित पाटील (वय ७० रा.विठ्ठलपेठ, जळगाव) यांना धडक दिल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ममुराबाद शिवारातील चांदेलचा मारोती मंदिराजवळ घडली. डिंगबर पाटील यांची ममुराबाद शिवारात शेती आहे. शेतीच्या कामासाठी ते रोज सायकलने जातात. शनिवारी काम आटोपल्यानंतर ते घरी येत असताना कारचा(एम.एच.१९ बी.यु.१०१०) त्यांना कट लागला. डोक्याला मार लागल्यामुळे कारचालक श्रीराम धनसिंग कोळी (रा.जळगाव) व त्याच्यासोबत असलेल्या सहकार्याने त्यांनी जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना एक तासाने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालक कोळी याच्याविरुध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक सागर शिंपी करीत आहेत. अपघातातील कार ही बड्या व्यक्तीची असल्याची चर्चा होती.