नवी दिल्ली : ‘वर्ल्डस् फास्टेस्ट किवी’ म्हणून प्रसिद्ध न्यूझीलंडच्या टीम चिट्टोक याने भारताच्या सुवर्ण चतुर्भुज (इंडियन गोल्डन क्वाड्रिलॅटरल) ही सुमारे ६ हजार किमीपर्यंची सायकलयात्रा पूर्ण करीत नवा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे.२४ वर्षीय चिट्टोक याने २७ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडच्या दूतावासापासून सायकलने प्रवास करीत चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगळुुरू, भुवनेश्वर, जयपूर, कानपूर, पुणे, सुरत, गुंटूर, विजयवाडा आणि विशाखापट्टणम असे जवळजवळ सहा हजार किमीचे अंतर पूर्ण केले. चिट्टोक याने न्यूझीलंडच्या वैकाटो विद्यापीठातून कायदा आणि अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. त्याने दररोज २५० कि.मी. अंतर पार पाडत २४ दिवसांमध्ये हा पल्ला गाठला. दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंड ते आॅस्ट्रेलिया असे अंतर पार करीत तो वेगवान सायकलपटू बनला होता. भारतीय सुवर्ण चतुर्भुज महामार्गावरून सायकलस्वारीबद्दल गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे.
सायकलयात्रेचा नवा विक्रम
By admin | Published: March 26, 2016 12:59 AM