नवी दिल्ली : तब्बल 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा चक्रिवादळामुळे मोठा विनाश होण्याची भीती आहे. अम्फानचा पहिला प्रहार पारादीपवर होईल. तेथे सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. बंगालच्या खाडीतून सुरू झालेले हे वादळ वेगाने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांकडे सरकत आहे. ते दुपारपर्यंत किनाऱ्यांवर धडकण्याची भीती आहे. 100 किलोमीटर दूर असलेल्या वादाळाच्या केंद्रात जवळपास 200 किलोमीटर वेगाने हवा सुरू आहे.
14 लाख जणांना सुरक्षित स्थळी हलवले -ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर सध्या शांतता पसरली आहे. कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच या वादळाच्या शक्यतेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या लोकांना सातत्याने सावध राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. तर 14 लाखहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. एनडीआरएफचे चमूही कामाला लागले आहेत.
जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप
ओडिशात 11 लाख लोकांचे स्थलांतर -ओडिशा आणि बंगालला या वादळाचा सर्वप्रथम सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशातील जवळपास 11 लाख लोकांना किनाऱ्यावरून हलवण्यात आले आहे. एमएमएसच्या माध्यमाने लोकांना वादळाची माहिती दिली जात आहे. कोस्टगार्डचे चमू आणि नौका सातत्याने समुद्रात गस्त घालत आहेत.
या वादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील जवळपास 3 लाखहून अधिक लोकांना किनारपट्टी भागांतून सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अम्फान चक्रीवादळ 185 किलो मीटर वेगाने पश्चिम बंगालच्या दीघा किनाऱ्यावर धडकू शकते.
'या' राज्यांना 'हाय' तर 'या' राज्यांना 'ऑरेंज' अलर्ट -अम्फानचे संकट पाहता, हवामान खात्याने ओडिशा आणि आसामसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम बंगाल, तामिलनाडू, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर आणि जम्मू काश्मीरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
200 किलो मीटरपेक्षाही अधिक असू शकते तीव्रता -21 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 मध्ये ओडिशातील पारादीप किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकले होते. त्या वादळाने प्रचंड हाहाकार घातला होता. आता पुन्हा हा धोका निर्माण झाला आहे. अम्फान जसजसे जळव येऊ लागले आहे. तसतशी त्याची थैमान घालण्याची क्षमता अधिक तीव्र होत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, हे वादळ जेव्हा पारादीप किनाऱ्याला धडकेल, तेव्हा त्याची तीव्रता 200 किलो मीटरहूनही अधिक असू शकते.
चीनची भीती! 'या'मुळे आता संपूर्ण जग देतंय भारताच्या पावलावर पाऊल, 'अशी' आखतंय रणनीती