भुवनेश्वर: पूर्व किनारपट्टीला असानी चक्रिवादळाचा फटका बसला आहे. या वादळामुळे आंध्र प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगाल, चेन्नईत मोठं नुकसान झालं आहे. आंध्र प्रदेश आणि ओदिशा राज्यांमध्ये हाल अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाकडून धोक्याचा इशारा देण्यात आल्यानंतरही ओदिशाच्या गंजाम जिल्ह्यातील काही मच्छिमार समुद्रात मासे पकडायला गेले. त्यांना तातडीनं किनाऱ्यावर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर हे मच्छिमार किनाऱ्याकडे जात असताना एक अपघात झाला. समुद्राच्या लाटांचा जोर वाढल्यानं एक बोट उलटली.
बोट समुद्राच्या किनाऱ्याजवळ असताना उलटल्यानं सुदैवानं कोणाचाही मृत्यू झाला नाही. बोट उलटताच सर्व मच्छिमारांनी पोहत किनारा गाठला. काही जणांना किरकोळ इजा झाली. या दुर्घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन विभागानं मच्छिमारांना १२ मेपर्यंत समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.