नवी दिल्ली : पाऊस आणखी काही दिवस सुरू राहू शकतो. ७ ते ९ मेदरम्यान बंगालच्या उपसागरातून मोचा चक्रीवादळ सक्रिय होईल. यामुळे केवळ देशाच्या पूर्व भागातच पाऊस पडणार नाही; तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड व पूर्व उत्तर प्रदेशातही हवामान खराब राहू शकते. अशा परिस्थितीत मच्छीमारांना पुढील चार दिवस समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
“बजरंग दल ही देशभक्तांची संघटना, बंदी घालून काँग्रेसचा मतं मिळवण्याचा प्रयत्न”
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगरी भागात अवकाळी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या तीन राज्यांत गारपीट होण्याची शक्यता आहे. केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.