शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

रेमल चक्रीवादळाचा तडाखा, मध्यरात्रीनंतर केला विनाश; १० ठार, दीड लाख लाेक विजेविना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:12 AM

बांगलादेश आणि प. बंगालच्या किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे शेकडो घरांचे नुकसान

कोलकाता/ढाका: बांगलादेश आणि प. बंगालच्या किनारपट्टीवर १२० किमी प्रतितास वेगाने धडकलेल्या चक्रीवादळ ‘रेमल’ने रविवारी मध्यरात्रीनंतर मोठा विनाश केला. बांगलादेशात शेकडो गावे पाण्याखाली गेल्याने किमान सात जण ठार झाले, तर वीजपुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका सुमारे दीड लाख लोकांना बसला. प. बंगालमध्ये किमान ३ जणांचा मृत्यू झाला, तर घरांचे मोठे नुकसान झाले आणि १५ हजार वृक्ष मुळासकट उन्मळून पडले. विमान आणि रेल्वेसेवाही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.

‘रेमल’ सोमवारी सकाळी कमकुवत  झाले. वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा फटका बांगलादेशातील अनेक भागांना बसला. ग्रामीण वीज प्राधिकरणाने ‘रेमल’चे नुकसान कमी करण्यासाठी किनारपट्टी भागातील दीड लाख लोकांची वीज खंडित केली होती. काही भागांत १२ तासांहून अधिक काळ वीज खंडित झाली. २१ तासांनंतर कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानसेवा सुरू झाली.

पश्चिम बंगालमध्ये शेकडाे घरांचे नुकसान

  • पश्चिम बंगालमधील रेमल चक्रीवादळामुळे २४ गट आणि ७९ नगरपालिका प्रभागांमधील सुमारे १५ हजार घरांचे नुकसान झाले. जास्त नुकसान दक्षिणेकडील किनारपट्टी भागात झाले. 
  • राज्याच्या विविध भागांत किमान २,१४० झाडे उन्मळून पडली आणि ३३७ वीज खांबही पडले. प्रशासनाने २ लाख ७ हजार ६० लोकांना १,४३८ सुरक्षित निवारागृहांमध्ये हलवले.

अमेरिकेत चक्रीवादळाच्या तडाख्याने १८ जणांचा मृत्यू

अमेरिकेतील टेक्सास, ओक्लाहोमा, अराकान्सास या भागांमध्ये चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे दोन बालकांसहित १८ जणांचा मृत्यू झाला. तुफानी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही घरे उद्ध्वस्त झाली तर काहींची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली. चक्रीवादळामुळे काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यामुळे विद्युतपुरवठा बंद होऊन अंधाराचे साम्राज्य पसरले.टेक्सासमधील कुकी काऊंटी येथे शनिवारी रात्रीपासून घोंघावणाऱ्या चक्रीवादळामुळे सात जणांचा मृत्यू झाला. कुक काऊंटीचे शेरीफ म्हणाले की, चक्रीवादळामुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने दोन बालकांसहित पाच जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :cycloneचक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालBangladeshबांगलादेश