भुवनेश्वर - बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं तितली या चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धारण केलं आहे. गुरुवारी (11 ऑक्टोबर) तितली चक्रीवादळ हे ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले. या चक्रीवादळामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पाऊस आणि वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, तितली हे चक्रीवादळ 10 किलोमीटर प्रतितास या वेगानं पुढे सरकले आहे.
तितली हे चक्रीवादळ भयंकर असून बंगालच्या खाडीतील दक्षिण आणि पश्चिम मध्य क्षेत्राला या वादळाचा फटका बसला आहे. गोव्यावरही या चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.