13 Jun, 19 02:15 PM
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला सुरक्षेचा आढावा
13 Jun, 19 11:45 AM
'त्या' 6 जणांचा मृत्यू वायू चक्रीवादळामुळे झाला नाही, प्रशासनाने केलं स्पष्ट
वायू चक्रीवादळामुळे आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं गुजरातचे प्रशासकीय अधिकारी पंकज कुमार यांनी सांगितले. वायू वादळामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी निराधार आहे. त्या 6 जणांचा मृत्यू वादळामुळे झाला नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं.
13 Jun, 19 10:02 AM
धोका टळला तरी लोकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेणार
वायू वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. वायूचा थेट धोका टळला असला तरी प्रशासन सुरक्षेसाठी तैनात ठेवणार आहे अशी माहिती गुजरातच्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पंकज कुमार यांनी दिली.
13 Jun, 19 09:24 AM
पोरबंदर समुद्रकिनारी NDRF च्या 6 टीम तैनात
वायू चक्रीवादळ गुजरातच्या समुद्रकिनारी धडकणार असून पोरबंदर बीचवर एनडीआरएफच्या 6 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. वायू वादळ गुजरातला थेट धडकणार नाही मात्र त्याचे परिणाम समुद्रकिनारी जाणवणार आहेत.
13 Jun, 19 09:10 AM
3 लाख लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, गुजरातला जाणाऱ्या 70 मेल रद्द
13 Jun, 19 08:56 AM
कोकणपट्टी तसेच गुजरातच्या समुद्रात मोठ्या लाटा
13 Jun, 19 08:45 AM
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
13 Jun, 19 08:28 AM
‘वायू’ चक्रीवादळ आज गुजरातेत धडकणार; मुंबईत पडझड सुरु झाल्याने धावाधाव
13 Jun, 19 08:11 AM
गुजरातला जाणाऱ्या 77 मेल रद्द
13 Jun, 19 08:00 AM
वायू चक्रीवादळ आज गुजरातमध्ये धडकणार
13 Jun, 19 07:46 AM
सौराष्ट्र व कच्छमधील बंदरे व विमानतळ बंद करण्यात आली आहेत.
13 Jun, 19 07:36 AM
वायू चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग वाढला
12 Jun, 19 05:05 PM
12 Jun, 19 04:54 PM
12 Jun, 19 04:34 PM
द्वारका समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांना सुरक्षितस्थळी नेताना एनडीआरएफची टीम.
12 Jun, 19 04:20 PM
वायू चक्रीवादळ महाराष्ट्राकडून गेले गुजरातच्या दिशेने
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी हवेच्या दाबामुळे वायू चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनाऱ्यावरील शहरांना बसणार आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्रापासून जलदगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 13 जून रोजी गुजरातच्या पोरबंदर आणि कच्छ या परिसरात वायू वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असून अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
12 Jun, 19 04:15 PM
12 Jun, 19 04:14 PM
वायू चक्रीवादळ मुंबईपासून पुढे सरकलं; हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
12 Jun, 19 03:56 PM
राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना मदत करण्याचे आवाहन
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायू चक्रीवादळात अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांची मदत करण्याचे कार्यकर्त्यांना केले आहे.
12 Jun, 19 03:07 PM
समुद्रकिनारी जाण्यावर लोकांना घातली बंदी, महाराष्ट्र सरकारचा निर्णय
वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पुढील 2 दिवस समुद्रकिनाऱ्यांवर लोकांना जाण्यासाठी बंदी घातली आहे. 12 आणि 13 जून रोजी राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील बीचवर जाण्यात लोकांना मनाई करण्यात आली आहे.
12 Jun, 19 03:02 PM
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उद्या सकाळपर्यंत गुजरातच्या पोरबंदर आणि महुआ समुद्रकिनारी वायू चक्रीवादळाची धडक बसणार आहे. त्यामुळे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. तसेच पर्यटकांना सुरक्षितस्थळी जाण्याचं आवाहन विजय रुपाणी यांनी केले.
12 Jun, 19 02:50 PM
NDRF ची टीम गुजरातमधील मोरबी येथे तैनात
गुजरात एनडीआरएफची टीम मोरबी याठिकाणी रवाना झाली आहे.
12 Jun, 19 02:14 PM
गुजरातमधील विमानसेवाही उद्या बंद
वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथून पोरबंदर, दीव, कांडला, भावनगर, मुंद्रा येथे उड्डाण घेणारी विमानसेवा उद्यासाठी बंद करण्यात आल्या आहेत.
12 Jun, 19 01:13 PM
पश्चिम रेल्वेकडून गुजरातला जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द
वायू वादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेकडून गुजरातला जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस, पॅंसेजर ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. पोरबंदर, भूज, ओखा, गांधीधाम, वेरावल याठिकाणी जाणाऱ्या रेल्वेगाड्या आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 14 जूनच्या सकाळपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
12 Jun, 19 12:57 PM
दीवमधील लोकांना NDRF टीमने सुरक्षितस्थळी हलवलं
दीवमधील 65 लोकांना एनडीआरएफच्या टीमने स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलवलं आहे.
12 Jun, 19 12:54 PM
वलसाडमधील 20 गावांना सतर्कतेचा इशारा, शाळा केल्या बंद
गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील 20 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. किनाऱ्यालगतच्या 39 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीम परिसरात तैनात केल्या आहेत.
12 Jun, 19 12:50 PM
वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तटरक्षक दल सज्ज
वायू चक्रीवादळ 170 किमी प्रतितास वेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतीय तटरक्षक दल सज्ज झालं आहे. कोणतंही जहाज अथवा मच्छिमार नौका समुद्रात आढळून आल्यानंतर त्यांना किनाऱ्याजवळ आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असल्याची माहिती तटरक्षक दलाचे अधिकारी कमांडर व्ही. डोगरा यांनी दिले आहेत.
12 Jun, 19 12:42 PM
गुजरातमधील कांडला पोर्ट सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरतं बंद
वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील कांडला पोर्ट तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे.तसेच पोर्टजवळ राहणाऱ्या लोकांना आणि मच्छिमारांना एनडीआरएफच्या टीमने सुरक्षित स्थळी रवाना केले आहे.
12 Jun, 19 12:34 PM
वायू चक्रीवादळ 170 किमी प्रतितास वेगाने गुजरातच्या दिशेने जातंय
गुजरातमधील पोरबंदर आणि महुआ या समुद्रकिनार पट्टीला उद्या सकाळपर्यंत वायू चक्रीवादळ धडकणार आहे.
12 Jun, 19 12:27 PM