शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

यात्रेसाठी रेल्वेतून नेत होते सिलिंडर, गॅस पेटवताच स्फोट, १० यात्रेकरू ठार, मदुराई रेल्वेस्थानकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 12:58 AM

दक्षिण रेल्वेने सांगितले की, रेल्वे कर्मचारी, पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव कर्मचाऱ्यांनी मदत व बचाव कार्य राबवून १० मृतदेह बाहेर काढले.

मदुराई (तामिळनाडू) : येथील रेल्वेस्थानकाजवळरेल्वेच्या खासगी डब्यात शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत १० प्रवासी मृत्युमुखी पडले. डब्यातून अवैधरीत्या आणल्या गेलेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडली, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेला डबा ‘प्रायव्हेट पार्टी कोच’ होता.  तीर्थयात्रेसाठी हा डबा बुक करण्यात आला होता. 

दक्षिण रेल्वेने सांगितले की, रेल्वे कर्मचारी, पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव कर्मचाऱ्यांनी मदत व बचाव कार्य राबवून १० मृतदेह बाहेर काढले. सहा मृतकांची ओळख पटविण्यात आली आहे. नागरकॉईल येथून हा डबा एका एक्स्प्रेसला जोडून मदुराईपर्यंत आणण्यात आला होता. तेथून तो लखनौला जाणाऱ्या गाडीला जाेडण्यात येणार होता़  तोपर्यंत डबा वेगळा करून उभा करण्यात आला होता. तो डबा एखाद्या गाडीला जोडलेला असता तर आणखी भीषण दुर्घटना घडली असती. 

परतीच्या वाटेतच काळाने गाठलेडब्यात ६५ प्रवासी होते. ते उत्तर प्रदेशातील लखनौहून मदुराईला जात होते. या प्रवाशांनी १७ ऑगस्ट रोजी लखनौहून प्रवास सुरू केला होता. २७ ऑगस्ट रोजी ते चेन्नईला जाणार होते. तेथून ते लखनौला परतणार होते. १५ लाख रुपयांची भरपाई मिळणारnमृतांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे. त्यातील १० लाख रुपये रेल्वे देईल. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे ३ लाख रुपये आणि उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री २ लाख रुपये देतील. nसहा मृतांची ओळख पटली असून, ते लखनौ, सीतापूर आणि लखीमपूर येथील रहिवासी आहेत. शत्रुदमन सिंह (सीतापूर), मिथिलेश कुमारी (सीतापूर), शांती देवी (लखीमपूर), मनोरमा अग्रवाल (लखनौ), हिमानी बन्सल (लखनौ) आणि परमेश्वर दयाल अशी मृतांची नावे आहेत.

अशी लागली आगडबा रेल्वे स्थानकावर उभा होता, तेव्हा काही प्रवाशांनी चहा-नाश्त्यासाठी डब्यातून बेकायदा आणलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा वापर केला. त्यावेळी सिलिंडरचा स्फोट होऊन आग भडकली.  

आम्ही झोपेत होतो, तेव्हा आरडाओरडा ऐकू आला. आम्ही उठून पळू लागलो. पण, दरवाजा बंद होता. कोणी तरी कुलूप तोडले आणि आम्ही बाहेर पडलो. डब्यात एवढा धूर झाला होता की, श्वास घेता येत नव्हता.- अलका प्रजापती, प्रवासी

टॅग्स :Keralaकेरळrailwayरेल्वे