गोंडा (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यात एका घरात जेवण बनवत असताना गॅस सिलेंडरचास्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. (Gonda Cylinder Blast) तसेच या दुर्घटनेत दोन्ही घरातील १५ जण ढिगाऱ्याखाली दबले जाऊन आठ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गोंडा जिल्ह्यातील वजीरगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील टिकरी गावात घडली. दुर्घटनेज जखमी झालेल्या सात जणांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर ढिगाऱ्याखाली एक लहान मुलगा दबलेला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (A cylinder Blast while cooking in Gonda, destroying two houses and killing eight people)
या दुर्घटनेत जमीनदोस्त झालेल्या घरांच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत दोन महिला, दोन पुरुष आणि चार मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर ढिगाऱ्याखाली सापडलेल्या सात जणांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. टिकरी गावातील नुरुल हसन यांच्या घरात गॅस सिलेंडरचास्फोट होऊन ही दुर्घटना घडली. या स्फोटात शेजारी फकिरे यांचेही घर कोसळले.