शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
3
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
4
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
5
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
6
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
7
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
8
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
10
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
11
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
12
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
13
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
14
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या
15
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
16
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
17
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
18
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
19
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
20
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल

Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर सरकार सतर्क; 'हे' प्रोडक्ट विकण्यावर घातली बंदी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 7:13 PM

Cyrus Mistry Death: सरकारने Amazon ला एक आदेश जारी केला असून, एक खास प्रोडक्ट विकण्यावर बंदी घातली आहे.

Cyrus Mistry Car Accident: नुकतेच टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे कार अपघातात निधन झाले. टाटा समुहाचे अध्यक्षपद आणि त्यानंतर झालेल्या वादामुळे सायरस मिस्त्री नेहमीच चर्चेत असायचे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, आपल्या कारमध्ये मागे बसलेल्या सायरस यांनी सीटबेल्ट न लावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्या अपघातानंतर आता सीटबेल्टच्या महत्त्वावर बरीच चर्चा होत आहे. यातच आता सरकारने शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनसाठी(Amazon)  एक खास आदेश जारी केला असून एका विशिष्ट उत्पादनाच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

सरकारने अॅमेझॉनसाठी जारी केला आदेशया आधीही भारतात सीटबेल्ट न लावल्यामुळे अनेक भीषण अपघात झाले आहेत. पण, आता मिस्त्री यांच्या अपघातानंतर सीट बेल्टची गरज आणि महत्त्व यावर बरीच चर्चा होत आहे. यातच सरकारने ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon साठी एक आदेश जारी केला आहे. परिवहन मंत्री नितीन गडकरी  (Nitin Gadkari) यांनी केवळ नियमच जारी केले नाहीत, तर एका उत्पादनाच्या विक्रीवरही बंदी घातली आहे.

हे उत्पादन विकण्यास मनाईनितीन गडकरी यांनी Amazon ला त्यांच्या साइटवर सीटबेल्ट अलार्म ब्लॉकर्सची(Seatbelt Alarm Blockers) विक्री थांबवण्यासाठी आदेश जारी केला आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले की, बरेच लोक अॅमेझॉनवरून क्लिप खरेदी करतात, ज्याचा वापर सीट बेल्ट अलार्म ब्लॉक करण्यासाठी केला जातो. या उत्पादनाची विक्री थांबवण्यासाठी अॅमेझॉनला नोटीस पाठवली आहे. NCRB 2021 च्या अहवालानुसार, भारतात रस्ते अपघातांमुळे 1,55,622 मृत्यू झाले आहेत आणि त्यापैकी 69,240 अपघात हे दुचाकी वाहनांमुळे झाले आहेत.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAccidentअपघातCyrus Mistryसायरस मिस्त्री