मुंबई : गुजरातचे माजी पोलीस उपसंचालक डी. जी. वंजारा व एम. एन. दिनेश यांची विशेष सीबीआय न्यायालयाने सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरणातून मंगळवारी आरोपमुक्तता केली. या खटल्यामधील मुख्य आरोपीचीच विशेष न्यायालयाने आरोपमुक्तता केल्याने सीबीआयला मोठा दणका बसला आहे.आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा अहमदाबादच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख होते. त्यानंतर त्यांना उपमहासंचालक करण्यात आले. तर राजस्थानमधील आयपीएस अधिकारी एम. एन. दिनेश हे गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख होते. अहमदाबादेत २००५मध्ये घडलेल्या बनावट चकमकीतील प्रमुख आरोपी म्हणून वंजारा यांचा उल्लेख सीबीआयने केला आहे. तर सोहराबुद्दिन शेखची हत्या करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकाचे नेतृत्व दिनेश यांनी केले होते. या दोघांचीही सीबीआयने निर्दोष सुटका केल्याने सीबीआयसाठी हा मोठा धक्का आहे.सीबीआयच्या म्हणण्यानुसार, सोहराबुद्दिन शेख व त्याची पत्नी कौसर बी हे दोघेही हैदराबादवरून महाराष्ट्रातील सांगलीत बसने येत असताना गुजरात पोलिसांनी या दोघांना अडवले. शेख हा दहशतवादी असल्याचे भासवत गुजरात पोलिसांनी त्याची हत्या केली. त्यानंतर काही दिवसांनी कौसर बीची हत्या केली. त्याशिवाय या घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तुलसीदास प्रजापती याचीही बनावट चकमकीद्वारे हत्या करण्यात आली.
डी. जी. वंजारा यांची आरोपमुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 4:45 AM