- संजय शर्मा
नवी दिल्ली: आगामी लोकसभा व यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार व भाजप संघटनेत जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मोठे फेरबदल होऊ शकतात. खराब कामगिरी असलेल्या १२ पेक्षा अधिक १२ पेक्षा जास्त मंत्र्यांना हटवून त्यांच्या जागी तेवढ्याच नव्या चेहेऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.
या फेरबदलामध्ये महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता केंद्रीय मंत्र्यांना हटवले जाऊ शकते. यात असून शिवसेना शिंदे गटातील दोघांना (एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री) स्थान देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही नावांचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोडण्यात आल्याचे समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री उशिरापर्यंत पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यामध्ये चार तासांहून अधिक काळ सरकार व संघटनेतील फेरबदलावर चर्चा झाली. या उच्चस्तरीय बैठकीत राज्यनिहाय चर्चा झाली. यात सर्व राजकीय स्थिती लक्षात घेऊन कोणाला वगळावे, त्या नावांवरही विचारविनिमय झाला. ६, ७ व ८ जुलै रोजी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
खराब कामगिरीमुळे १२ मंत्र्यांवर गंडांतर?- महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांची नावे समाविष्ट आहेत. | उत्तर प्रदेशच्या चार ते पाच केंद्रीय मंत्र्यांना हटवले जाणे निश्चित मानले जात आहे. कर्नाटक, पंजाब, तेलंगणा व हरियाणामधून प्रत्येकी एका मंत्र्याला हटवले जाऊ शकते.- भाजपच्या २-३ राष्ट्रीय सरचिटणीसांना हटविण्यावरही चर्चा झाली. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा मिझोरामच्या निवडणूक प्रभारींच्या नावावरही या बैठकीत चर्चा झाली.
बिहार : पासवान यांची शक्यताबिहारमधून लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांना मंत्री केले जाऊ शकते. लोक जनशक्ती पार्टीच्या दुसया गटाचे पशुपती पारस आधीच मंत्री आहेत. पारस याना मंत्री म्हणून कायम ठेवावे, असे पंतप्रधानांनी निश्चित केल्याचे कळते.
राजस्थान : दिया कुमारींना संधी?राजस्थानमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन दिया कुमारी यांना मंत्री केले जाण्याची शक्यता आहे. त्या जयपूरच्या राजघराण्यातील महिला असल्यामुळे त्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता अधिक आहे,
तेलंगणा: किशन रेड्डी यांना काय?तेलंगणामध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना मंत्रिपदावरून हटवून तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष केले जाण्याची शक्यता आहे. तेलंगणा भाजपचे अध्यक्ष संजय बंदी यांना केंद्रीय मंत्री केले जाण्यावरही यावेळी चर्चा झाली.
छत्तीसगड : विजय बघेल चर्चेतमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्याबाबतही चर्चा झाली. दोहोंच्या कामावर भाजप नेतृत्व खुश नाही. मध्य प्रदेशात काही बदल दिसू शकतात. छत्तीसगडमध्येही विधानसभा निवडणुका होत असून, तेथून एकाला केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते. यामध्ये दुर्गचे खासदार विजय बघेल यांच्या नावाची चर्चा आहे.
भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर काय बदल करावे यावरही दीर्घकाळ खल झाला, तो असा....भाजप खासदारांची ४ जुलैला बैठक भाजपच्या सर्व खासदारांची बैठक जे. पी. नड्डा यांनी ४ जुलै रोजी बोलावली आहे. या बैठकीत खासदारांना नरेंद्र मोदी यांचा संदेश सांगितला जाणार आहे. पंतप्रधानांनी भाजपच्या सर्व खासदारांना देशातील गरीब, कमजोर, मागास, शोषित वर्ग व मध्यमवर्गाच्या लोकांमध्ये जाण्यास सांगितले आहे, तेथे जाऊन त्यांना केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देऊन त्यांच्यापर्यंत या योजनेचे लाभ पोहोचवावेत, असे सांगितले आहे,
लोकसभेसाठी अशी असेल विभागणीआगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन भाजपने देशातील सर्व राज्यांची पूर्व, उत्तर व दक्षिण अशा तीन सेक्टरमध्ये विभागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचा दक्षिण सेक्टरमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही सेक्टरच्या राज्यांबरोबर जे. पी. नड्डा प्रदीर्घ बैठक घेणार आहेत. त्यात राज्याचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश प्रभारी, प्रदेश सरचिटणीस संघटन, संघटनमंत्री, खासदार, आमदार, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सहभागी होतील.