चंदीगड : संगीतकार विशाल ददलानी यांनी जैन साधू तरुण सागर यांची बुधवारी भेट घेऊन वादग्रस्त टि्वटबद्दल त्यांची व्यक्तिश: माफी मागितली. ददलानी यांनी तरुण सागर महाराजांबाबत आक्षेपार्ह टिष्ट्वट केले होते व त्यामुळे वाद उफाळला होता. ददलानी आज तरुण सागर महाराजांच्या येथील आश्रमात आले आणि ‘पंच माफी’ या जैन समाजाच्या परंपरेप्रमाणे क्षमा मागितली. ददलानी यांच्या क्षमायाचनेनंतर जैन साधू त्यांना म्हणाले की, मी तुम्हाला आधीच माफ केले आहे. तुम्ही जैन समाजाची क्षमा मागावी तसेच टिष्ट्वटरवरील टिष्ट्वट डीलीट करून हा विषय संपल्याचे जाहीर करावे. विशालच्या टिष्ट्वटमुळे मला व्यक्तिश: दु:ख किंवा वेदना झाल्या नाहीत हे मी सुरुवातीपासून सांगत आलोय. मी आज विशालशी हेच बोललो. मी त्याला म्हणालो की, जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्याने माझी माफी मागावी, ही समाजाची मागणी होती. तो आज मुंबईहून आला. माफी मागण्यासाठी त्याने तेथूनच श्रीफळ सोबत आणले होते, असेही ते म्हणाले. तरुण सागर महाराजांनी गेल्या महिन्यात हरियाणा विधानसभेत भाषण केले होते. त्यानंतर ददलानी यांनी त्यांच्याबाबत आक्षेपार्ह टिष्ट्वट केल्याने वाद उफाळला होता. चूक कोणाच्याही हातून होऊ शकतो. अगदी माझ्याही. विशाल माझ्यासमोर आल्यास त्याला पंचमाफी मागण्याची विनंती करण्यात येईल आणि मग हा विषय संपेल, अशी जैन समाजाची भूमिका होती, असेही महाराजांनी म्हटले. (वृत्तसंस्था)
जैन साधू तरुण सागर यांची ददलानी यांनी मागितली माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 4:24 AM