लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नायगाव खोऱ्यातील जगन्नाथ सानप या शेतकऱ्याने गुरुवारी (दि. २३) ४ क्विंटल कांदा विक्री केला. त्याला नफा तर झाला नाहीच, वर भाड्यापोटी ३१८ रुपये खिशातून द्यावे लागले.
जगन्नाथ सायखेडा मार्केटला चार क्विंटल कांदे विक्रीसाठी घेऊन गेले. कांद्याला २०० भाव मिळाल्याने ८३० रुपयांची पट्टी हातात पडली. त्यात तोलाई, हमाली ४८.०६, तसेच लिलावाच्या वेळी सांडलेले कांदे भरणे २०० रुपये असा खर्च २४८.०६ आला. खर्च वजा जाता ५८१.९४ पैसे हातात पडले. त्यातून कांदा वाहतूक करणाऱ्या वाहनाचे ९०० रुपये इतके भाडे देण्यासाठी त्यांना खिशातून ३१८.०६ पैसे मोजावे लागले.
ताेटा सहन करणार तरी किती?n सध्या शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. कधी निसर्ग तर कधी शेतकरीविरोधी धोरण यांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. n सुनील बोरगुडे यांनी रांगड्या कांद्याची दोन एकरांत लागवड केली. त्यासाठी रोपांचा खर्च, लागवड खर्च, अनेक वेळा औषधांचा खर्च केला आहे. n कांद्याचे बाजारभाव व खर्च यांचा कुठेच ताळमेळ बसेना. शेवटी उभ्या व चांगल्या कांद्यावर रोटाव्हेटर फिरवण्याचा निर्णय घेतला.