अजबच! म्हशीच्या शेणामुळे मालकाला तब्बल १० हजारांचा दंड; मध्य प्रदेशातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 02:54 PM2020-12-30T14:54:45+5:302020-12-30T15:01:03+5:30

एक अजब घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. रस्त्यावर पडलेल्या शेणामुळे थेट म्हशीच्या मालकाला तब्बल १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे समोर आले आहे.

dairy operator of gwalior fined for Rupees 10 thousand for buffalo dung | अजबच! म्हशीच्या शेणामुळे मालकाला तब्बल १० हजारांचा दंड; मध्य प्रदेशातील घटना

अजबच! म्हशीच्या शेणामुळे मालकाला तब्बल १० हजारांचा दंड; मध्य प्रदेशातील घटना

Next
ठळक मुद्देम्हशीच्या शेणामुळे मालकाला १० हजार रुपयांचा दंडग्वाल्हेर महानगरपालिकेची अजब कारवाईदंड केल्याची रिसीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

ग्वाल्हेर : भारतात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही. अशीच एक अजब घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. रस्त्यावर पडलेल्या शेणामुळे थेट म्हशीच्या मालकाला तब्बल १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे समोर आले आहे. ग्वाल्हेर महानगरपालिकेकडून हा दंड करण्यात आला आहे. 

ग्वाल्हेर महानगरपालिकेकडून ठोठावण्यात आलेल्या दंडाची रिसीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. ग्वालियर महानगरपालिकेकडून एका नवीन रस्त्याचं काम सुरू होते. त्यावेळी बेताल सिंग नामक डेअरी मालकाच्या एका म्हशीने रस्त्यावर घाण केली. नेमक्या याचवेळी रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिकेचे आयुक्त तिथे पोहोचले. नव्या रस्त्यावर म्हशीचे शेण पडल्याचे दिसले आणि म्हशीच्या मालकाला दंड ठोठावण्याचा आदेश दिला. 

यासंदर्भात बोलतना ग्वालियर महानगरपालिकेचे अधिकारी मनीष कनोजिया यांनी सांगितले की, ग्वाल्हेर शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे काम सुरू आहेत. रस्त्यावर आणि शहरातील इतर ठिकाणी कचरा होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. रस्त्यावर टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करत त्यांना दंड ठोठावला जात आहे. तसेच स्वच्छतेबाबतही जागरुकता करण्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असताना बेताल सिंगच्या म्हशी रस्त्यावर फिरत होत्या. त्यांना सांगूनही त्याने म्हशींना हटवले नाही. आयुक्तांच्या आढावा दौऱ्यावेळी म्हशीचे शेण आढळून आले. तेव्हा बेताल सिंगविरोधात कारवाई करत १० हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले. डेअरी मालकानेही चूक मान्य केली असून, महापालिकेच्या कार्यालयात दंड भरला आहे, असे माहिती मिळाली आहे. 

 

Web Title: dairy operator of gwalior fined for Rupees 10 thousand for buffalo dung

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.