बोधगया: बौद्ध धर्मगुरू दलाई लामा एका कार्यक्रमानिमित्त येथे आलेले असताना त्यांच्यावर चीनमधील एक महिला गुप्तहेर पाळत ठेवून असल्याचा पोलिसांना संशय आहे. या दृष्टीने त्यांनी महिलेचे रेखाचित्र जारी करून शोध सुरू केला होता. माेठया प्रयत्नानंतर बोधगयेत गुप्तहेर महिलेला अटक करण्यात आली असून, तीची चाैकशी सुरू आहे.
दलाई लामा यांच्या दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव सांग जिआलॉन असे सांगितले जात आहे.
महिनाभरापूर्वी अलर्ट
गया येथे राहणाऱ्या या चिनी महिलेविषयी पोलिसांना दोन वर्षांपासून माहिती मिळत होती. या चिनी महिलेबाबत महिनाभरापूर्वी अलर्ट जारी करण्यात आला होता. बोधगयेतील विश्रामगृहे, मठ, हॉटेलमध्ये तिचा शोध घेण्यात आला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"