कोट्टायम : नुकताच प्रेमविवाह केलेल्या दांपत्यातील नवºया मुलाचे अपहरण व हत्या केल्याचे केरळमध्ये उघडकीस आले आहे. दोन दिवसांपूर्वी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार देणाºया वडिलांना पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या दौºयाचे कारण देऊन टाळले होते. दुसºयाच दिवशी मुलाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.दलित ख्रिश्चन कुटुंबातील असलेल्या केविन पी. जोसेफ याने आयटीआयमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला होता. नीनू महाविद्यालयात शिकत होती. दुबईत नोकरीसाठी गेलेला केविन जानेवारीत कोट्टायमला परतला. नीनू ख्रिश्चन कुटुंबातील मुलगी असून, तिची आई मुस्लीम आहे. केविन-नीनूचे दोन वर्षांपासून प्रेम होते. मात्र, त्याला तिच्या भावाचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी शुक्रवारी रजिस्टर विवाह केला. केविन चुलत भाऊ अनिशकडे तर नीनू हॉस्टेलमध्ये राहत होती.रविवारी पहाटे तीन गाड्यांतून आलेल्या गुंडांनी केविन व अनिशला मारहाण केली. केविनचे अपहरण करून ते निघून गेले. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह नाल्यात आढळूला. नीनूच्या भावानेच गुंडांकरवी हत्या घडवून आणली असावी, असा पोलिसांना संशय आहे. तो भाऊ फरार आहे. आॅनर कीलिंगची शक्यता लक्षात घेऊन चौकशीसाठी चार पथके स्थापन केली आहेत. मात्र, या हत्येप्रकरणी पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळणार नाही, असे नीनूने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
दलित ख्रिश्चन तरुणाची प्रेमविवाह केल्याने हत्या; वडिलांची हत्येआधीच तक्रार, पण पोलीस म्हणे, सीएम दौऱ्याने व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 5:22 AM