शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

दलित भेदभावावरून संसद दणाणली

By admin | Published: December 03, 2015 3:17 AM

दलितांना मिळणाऱ्या भेदभावाच्या वागणुकीवरून संसदेत बुधवारी दुपारपर्यंत दोन्ही सभागृहात प्रचंड रणकंदन झाले. संविधान दिनाच्या निमित्ताने राज्यसभेत सलग तीन

नवी दिल्ली : दलितांना मिळणाऱ्या भेदभावाच्या वागणुकीवरून संसदेत बुधवारी दुपारपर्यंत दोन्ही सभागृहात प्रचंड रणकंदन झाले. संविधान दिनाच्या निमित्ताने राज्यसभेत सलग तीन दिवस डॉ.आंबेडकरांच्या जीवन प्रवासाचीही चर्चा झाल्यानंतर, बुधवारी दलितांना मिळणाऱ्या वागणुकीवर दोन्ही सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला. राज्यसभेत सेलजा यांच्या तक्रारीवरून तर लोकसभेत हरयाणातल्या दोन दलित मुलांच्या हत्याकांडानंतर केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी व्यक्त केलेल्या बेजबाबदार प्रतिक्रियेच्या विरोधात, काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारल्यावर मोदी सरकार व व्ही.के.सिंगांच्या विरोधात काँग्रेस सदस्यांची अखंड घोषणाबाजी लोकसभेत सुरू होती.गुजरातच्या बेट व्दारका मंदिरातल्या पुजाऱ्याने आपल्या जातीची चौकशी केली या माजी केंद्रीय मंत्री कुमारी सेलजा यांच्या आरोपाचे खंडन राज्यसभेत अर्थमंत्री अरूण जेटलींनी केले. इतकेच नव्हे तर ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी सेलजांच्या कृत्रिम बनावटी भेदभावाचे (मॅन्युफ्रॅक्चर्ड डिस्क्रिमिनेशन)चे हे उदाहरण असल्याची शेरेबाजी करताच सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळात राज्यसभेचे कामकाज दुपारी ३.३0 पर्यंत चारदा तहकूब झाले. अखेर उपसभापती कुरियन यांनी आपल्या दालनात सेलजांच्या उपस्थितीत विविध पक्षांच्या तमाम गटनेत्यांची बैठक घेतली व या तणावातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. कामकाज तोपर्यंत तहकूब ठेवण्यात आले. उभय पक्षांमधे समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नात अखेर तडजोड झाली की नाही, त्याचा खुलासा सभापतींच्या सल्ल्याने गुरूवारी सभागृहातच केला जाईल, असे कुरियन यांनी सभागृहाला सांगीतले. राज्यसभेतल्या गदारोळाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की संविधान दिनाच्या चर्चेत भाग घेतांना सोमवारी कुमारी सेलजा म्हणाल्या, ‘गुजरातमधील व्दारकेत अनेक प्राचीन मंदिरे आहेत. समुद्रातल्या एका बेटावर यापैकी बेट व्दारका हे प्राचीन कृष्ण मंदिर आहे. केंद्रीय मंत्री असतांना मी तिथे दर्शनाला गेले तेव्हा मला माझी जात विचारण्यात आली. गुजरातचे तथाकथित विकास मॉडेल यालाच म्हणायचे काय? सरकारला असा उपरोधिक सवाल विचारतांना सेलजांना आपला भावनावेग सभागृहात आवरता आला नाही. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचा बुधवारी स्वयंस्फूर्त खुलासा करतांना जेटली म्हणाले, सेलजांचा आरोप खरा नाही. व्दारकेत मंदिराच्या व्यवस्थापनाची, तिथल्या स्वच्छतेची, प्रशंसा करणारा अभिप्राय सेलजांनी स्वत:च तिथल्या अभिप्राय पुस्तिकेत लिहिला आहे. सेलजांचा हा अभिप्रायही जेटलींनी सभागृहाला वाचून दाखवला. यावेळी धावतच सभागृहात परतलेल्या सेलजांनी जेटलींना बजावले, आपण सभागृहाचे नेते आहात, कृपाकरून माझ्याबाबत सर्वांची दिशाभूल करू नका. (लोकमत न्यूज नेटवर्क)