ऑनलाइन लोकमत
हरयाणा, दि. २९ - येथील सुनपेड गावात घडलेल्या दलित हत्याकाडांला एक वेगऴे वळण आले आहे. या हत्याकांडात दोन मुलांचा जऴून मृत्यू झाला होता. या मुलांचा मृत्यू बाहेरील लोकांकडून आग लागल्याने नाही, तर घरातून आग लागल्याने झाल्याचे फॉरेन्सिक अहवालावरून सांगण्यात येत आहे.
दलितांच्या एका कुटुंबाला जाळण्याची घटना २० ऑक्टोबरला घडली होती, यामध्ये अडीच वर्षे आणि ११ महिने वयाच्या बहीण भावांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच, या मुलांची आई आणि वडील जखमी झाले आहेत. याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरु असून काल फॉरेन्सिकच्या अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी करत आपला अहवाल सीबीआयकडे सोपविला. या अहवालात फॉरेन्सिकच्या अधिका-यांनी घरात आगलेली आग ही बाहेरुन नसून आग आतून लागल्याचे म्हटले आहे. घरातील खोलीत अंथरुणाखाली अर्धवट जऴालेली केरोसीनची बाटली आणि काडी पेटी सापडल्याचे अधिका-याने सांगितले. तसेच, यासंदर्भातील अहवाल सीबीआयकडे सोपविण्यात आल्याचे म्हटले आहे.