नाशिक : सचिन शिंदे डान्स अकॅडमीच्या वतीने आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरबा व रासदांडिया यांचे शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी दि. १६ ते २७ सप्टेंबर या कालावधीत कॉलेजरोड, गोविंदनगर, मुंबई नाका या विविध ठिकाणी कार्यशळेचे आयोजन करण्यात आले होते. गरबा व दांडिया शिकण्यासाठी गरबाप्रेमींची प्रचंड गर्दी झाली होती. या कार्यशाळेत गरब्याचे विविध नृत्य प्रकार शिकविण्यात आले. विविध वयोगटातील तरुणांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. (वा.प्र.)
सचिन शिंदे डान्स अकॅडमीतर्फे नृत्य कार्यशाळा
By admin | Published: October 05, 2016 11:59 PM