शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

दुसऱ्या लाटेचा धोका कायम, सावध राहिल्यास तिसरी लाट नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 5:54 AM

संक्रमण दर १० टक्क्यांहून अधिक; १०० जिल्ह्यांत दररोज १०० रुग्ण

ठळक मुद्देकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले की, आंध्र प्रदेशमध्ये ९, अरुणाचल प्रदेश मध्ये १३, मणिपूरमध्ये ७, मेघालयात ८, राजस्थानमध्ये १० जिल्ह्यांत संक्रमणाचा दर चिंतेचा आहे

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : कोरोनाचा फैलाव वेगाने कमी होत असला तरी सरकारचे म्हणणे असे की, १६ राज्यातील ७१ जिल्ह्यात कोविड-१९ चा धोका कायम आहे. या जिल्ह्यात संक्रमणाचा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या आठवड्यापर्यंत चिंताजनक स्थितीच्या महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आता धोकादायक स्थितीच्या जिल्ह्याच्या यादीत नाहीत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले की, आंध्र प्रदेशमध्ये ९, अरुणाचल प्रदेश मध्ये १३, मणिपूरमध्ये ७, मेघालयात ८, राजस्थानमध्ये १० जिल्ह्यांत संक्रमणाचा दर चिंतेचा आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. पॉल म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट अजून पूर्ण संपलेली नाही. १०० जिल्ह्यात आजही रोज १०० रुग्णांची नोंद होत आहे. केंद्र सरकारची तुकडी अनेक राज्यात पाठवली गेली आहे. या राज्यात छत्तीसगड, केरळ, ओदिशा, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये संक्रमण वाढल्याची माहिती मिळाली आहे. संक्रमण कोणतेही राज्य आणि जिल्ह्यातून पूर्ण देशात होऊ शकते. म्हणून संक्रमण पूर्ण देशातून संपेपर्यंत आम्ही सुरक्षित नाही, असे पॉल म्हणाले. 

देशात २४ तासांत ४६,६१७ नवे रुग्णनवी दिल्ली : भारतात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात कोरोनाचे ४६,६१७ नवे रुग्ण आढळले तर ८५३ जणांचा मृत्यू झाला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनाद्वारे सांगितले. नव्या रुग्ण संख्येनंतर देशात एकूण रुग्णांची संख्या ३,०४,५८,२५१ झाली आहे व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१ टक्के झाले आहे. कोरोना विषाणूने देशात आतापर्यंत चार लाख ३१२ जणांचा बळी घेतला आहे तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ५ लाख ९ हजार ६३७ वर आली आहे. एकूण रुग्ण संख्येत हे प्रमाण १.६७ टक्के आहे. २४ तासात १३,६२० रुग्ण घटले आहेत. सलग २५ व्या दिवशी रुग्ण सकारात्मक निघण्याची टक्केवारी पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे तर नव्या रुग्ण संख्येच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण सलग ५० व्या दिवशी जास्त आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

सावध राहिल्यास तिसरी लाट नाहीतिसरी लाट येणे न येणे हे आमच्या हाती आहे. जर आम्ही शिस्त पाळली, दृढनिश्चय केला तर ती लाट येणार नाही. डेल्टा प्लसच्या संक्रमणाबद्दलही पॉल म्हणाले की, त्याचे रुग्ण १२ राज्यात मर्यादित असून रुग्ण संख्या वाढून ५६ झाली आहे, असे डॉ. पॉल म्हणाले.

डेल्टा विषाणूमुळे युरोपमध्ये तिसऱ्या लाटेचा इशाराnसंयुक्त राष्ट्र : जगात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा कहर वाढू लागला आहे. हा विषाणू वेगाने पसरू लागला असून जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू ९६ देशांत पसरल्याचे सांगितले आहे. येत्या महिन्यांत कोरोनाचे हे नवे रूप जगासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हा विषाणू पहिल्यांदा भारतात सापडला होता. मंगळवारपर्यंत हा डेल्टा व्हेरिअंट ९६ देशांमध्ये सापडला आहे. nहूने ही आकडेवारी जाहीर केली. हा आकडा आणखी वाढू शकतो, कारण विषाणूच्या या रुपाची ओळख पटविण्यासाठी जीनोम सीक्वेंसिंग क्षमता या मर्यादित आहेत. अनेक देशांनी डेल्टा व्हेरिअंटमुळे संक्रमण वाढत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस