शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

अमेरिका भारताला मोठा झटका देण्याच्या तयारीत? 'त्या' खरेदीवरून कारवाईची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 4:20 PM

भारत रशियामध्ये झालेल्या करारावरून अमेरिका नाराज; आक्षेप नोंदवला

नवी दिल्ली/वॉशिंग्टन: भारतानंरशियाकडून एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णयाला अमेरिकेनं पुन्हा एकदा आक्षेप नोंदवला आहे. रशियाकडून एस-४०० ट्रायम्फ क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये समस्या असल्याचं ज्यो बायडन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. 

अमेरिकेच्या डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट वेंडी शर्मन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एस-४०० क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याच्या निर्णयाबद्दल आक्षेप नोंदवला. हा करार सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणाच्याच हिताचा नाही, असं शर्मन म्हणाल्या. भारत आणि अमेरिका यांचे संबंध अतिशय मजबूत असून दोन्ही देश द्विपक्षीय चर्चेतून हा मुद्दा सोडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'जो देश एस-४०० यंत्रणेचा वापर करतो, त्यांच्याबद्दलची आमची भूमिका आणि धोरण स्पष्ट आहे. एस-४०० यंत्रणा धोकादायक आहे आणि ती कोणाच्याही हिताची नाही. मात्र तरीही भारत आणि अमेरिकेचे संबंध अतिशय दृढ आहेत,' असं शर्मन यांनी सांगितलं. नाटो संघटनेचा सदस्य असलेल्या तुर्कस्ताननं एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी केल्यावर अमेरिकेनं त्यांच्यावर निर्बंध लादले होते. त्यामुळे अशीच कारवाई भारताविरोधात केली जाण्याची शक्यता आहे.

द्विपक्षीय चर्चेतून मुद्दा सुटेल; अमेरिकेला विश्वासएस-४०० क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाबद्दल अमेरिकेनं नाराजी व्यक्त केली. एस-४०० खरेदी केल्याबद्दल अमेरिका भारतावर निर्बंध लादणार का, असा प्रश्न एका पत्रकारानं शर्मन यांना विचारला. त्यावर आम्ही भविष्याबद्दल बराच विचार करत आहोत. दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून अनेक समस्या सोडवल्या आहेत. ही समस्यादेखील आम्ही सोडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाrussiaरशिया