टाकाऊ भाज्यातून तयार केले विविध पदार्थ शून्य कचरा नियोजन: कच्छी जैन मंडळाचा उपक्रम
By admin | Published: September 02, 2015 11:31 PM
सोलापूर : कचर्याची समस्या सोडविण्यासाठी टाकाऊ भाजीपाल्यातून अनेक चविष्ट पदार्थ बनविण्याचा र्शी सर्वोदय कच्छी मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी कौतुक केले आहे.
सोलापूर : कचर्याची समस्या सोडविण्यासाठी टाकाऊ भाजीपाल्यातून अनेक चविष्ट पदार्थ बनविण्याचा र्शी सर्वोदय कच्छी मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी कौतुक केले आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत र्शी सर्वोदय कच्छी जैन मंडळाने स्मार्ट वॉर्ड तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानंतर कचर्याची समस्या सोडविण्यासाठी शून्य कचरा नियोजन ही संकल्पना मांडली आहे. स्वयंपाक घरात आणलेल्या भाज्यांचा वापर झाल्यानंतर देठे, साली व इतर भाग काढून कचर्यात टाकले जातात. पण भाज्यांचे देठ व सालीपासून अनेक चविष्ठ पदार्थ बनविता येतात. असा प्रयोग कच्छी जैन मंडळाचे चंदुभाई देढीया, उषाबेन शहा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. याचे प्रात्यक्षिक आयुक्त काळम-पाटील यांना दाखविण्यात आले. भोपळ्याच्या सालीपासून चटणी, कलिंगडाचा पांढरा गर व फ्लॉवरचे पान, केळीच्या सालापासून भाजी व थालीपीठ, पालकाच्या देठापासून पेंडपाला, कोथिंबीरच्या देठापासून मसाला, दोडक्याच्या सालीपासून शिरा व चटणी, पिळलेल्या लिंबाच्या सालीचे लोणचे, डाळिंबाची साल वाळवून औषध, बटाट्याच्या सालीची पावडर असे अनेक रुचकर पदार्थ तयार केले. बाजारातून आणलेल्या भाज्या निवडल्यानंतर टाकलेले देठ व सालीपासून निम्मा ओला कचरा निर्माण होतो. हा कचरा वेळेत उचलला गेला नाही तर कुजून दुर्गंधी सुटते. त्यामुळे कचर्याची समस्या निर्माण होते. पण भाज्या नीट करताना देठ व सालीचे नियोजन केले तर भाज्यांचा खर्च वाचेल याशिवाय कचर्याची समस्या निर्माण होणार नाही असे उषाबेन शहा यांनी सांगितले. महिला मंडळे, बचत गट, स्वयंसेवी संस्थाद्वारे ही संकल्पना घरोघरी पोहोचवा असे आदेश महापालिका आयुक्त काळम?पाटील यांनी स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक दत्तात्रय चौघुले यांना दिले. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी उपायुक्त र्शीकांत मायकलवार, सहायक आयुक्त प्रदीप साठे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके आदी उपस्थित होते.