शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

‘डेंग्यू’ रुग्णाला आवश्यकता नसताना प्लेटलेट देणे धोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2016 5:57 AM

डेंग्यूच्या रुग्णाला आवश्यकता नसताना प्लेटलेट (रक्तबिंबाणू) चढविणे धोक्याचे असून, त्यामुळे रुग्णात सेप्सीससारखी गुंतागुंत संभवते

नवी दिल्ली : डेंग्यूच्या रुग्णाला आवश्यकता नसताना प्लेटलेट (रक्तबिंबाणू) चढविणे धोक्याचे असून, त्यामुळे रुग्णात सेप्सीससारखी गुंतागुंत संभवते, असे आरोग्यतज्ज्ञांनी म्हटले आहे. संसर्गाला प्रतिकार करताना शरीराकडून स्वत:च्याच पेशी आणि अवयवांना इजा पोहोचविली जाण्याच्या आजाराला ‘सेप्सीस’ असे म्हणतात. हा आजार प्राणघातक आहे. दिल्लीत या विषाणूजन्य आजाराने १९ जणांचा बळी घेतला. रुग्णांची संख्या १,३०० वर पोहोचली आहे. डेंग्यूच्या रुग्णांत रक्तातील प्लेटलेटस्चे प्रमाण घसरते आणि जर त्याची भरपाई झाली नाही, तर रुग्णाच्या जीवाला धोका संभवू शकतो. मात्र, प्लेटलेट कमी झाल्यानंतर सरधोपटपणे प्लेटलेट चढविणे हा त्यावर उपाय नाही किंवा तो एकमेव पर्यायही नाही. मुळात डेंग्यूच्या बहुतांश रुग्णांना प्लेटलेट चढविण्याची गरजच नसते. याबाबत लोकांत जागृती घडवून आणण्याची गरज आहे, असे हृदयरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) भावी अध्यक्ष डॉ. डी.के. अग्रवाल यांनी सांगितले. हार्ट केअर फाऊंडेशन आॅफ इंडिया आणि आयएमएने प्लेटलेट चढविण्याच्या विषयावर आज संयुक्तपणे वेबकास्ट उपक्रम घेतला. प्लेटलेट हा डेंग्यूने प्रभावित होणाऱ्या रक्तघटकांतील प्रमुख घटक आहे. प्लेटलेटचे रक्तातील सामान्य प्रमाण १.५ ते ४.५ लाख एवढे असते. आवश्यकता नसताना प्लेटलेट दिल्यास अधिक इजा होऊन रुग्णांत सेप्सीस तसेच रक्त संक्रमणाशी संबंधित इतर गुंतागुंत संभवते, असे मिशन जन जागृती ब्लड बँकेचे वैद्यकीय संचालक डॉ. एन.के. भाटिया यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>संकेत समजल्यास डेंग्यूचे सर्व मृत्यू टाळता येऊ शकतातडेंग्यू हॅमरहगिक फीव्हरच्या रुग्णांत प्लेटलेटचे प्रमाण २० हजार किंवा त्याहून खाली घसरल्यास रक्तस्राव होऊ शकतो. बहुतांश डेंग्यू रुग्णांना ही वेळच येत नाही, असे अग्रवाल म्हणाले. डेंग्यू रुग्णांत गुंतागुंत निर्माण होण्याचे प्रमाण केवळ एक टक्का आहे. लोकांना धोक्याचे संकेत समजल्यास डेंग्यूचे सर्व मृत्यू टाळता येऊ शकतात. सर्व डेंग्यू रुग्णांना प्लेटलेट चढविण्याची आवश्यकता असते; यात तथ्य नाही. यंत्राद्वारे मिळविलेली प्लेटलेटस्ची संख्या विश्वसनीय नसून त्यात ४० हजारांपर्यंतची तफावत आढळते, असा दावाही त्यांनी केला. डेंग्यूने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांत नव्याने तयार झालेल्या प्लेटलेटस्चे प्रमाण ठराविक पातळीएवढे किंवा त्याहून अधिक असेल, तर अशा रुग्णांना प्लेटलेट देण्याची गरज नसते, असे अलीकडेच झालेल्या अभ्यासात आढळले आहे.