शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

वडिलांचा जीव वाचविण्यासाठी धावून आली लेक; लालूप्रसाद यादवांना मुलीने दिली किडनी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 8:07 AM

दोघांची प्रकृती उत्तम, लालूंचे धाकटे पुत्र व उपमुख्यमंत्री तेजस्वी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

पाटणा : राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांचे सिंगापूर येथील रुग्णालयात सोमवारी किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले. मुलगी रोहिणीने लालूंना किडनी दान केली. लालूंच्या आधी रोहिणीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोघांनाही अतिदक्षता कक्षात हलवण्यात आले असून, दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. रोहिणीने याआधीच प्राथमिक वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण केली आहे. तिची किडनी सध्या ९० ते ९५ टक्के काम करीत आहे. लालूंच्या दोन्ही किडनी २८ टक्के काम करीत आहेत. प्रत्यारोपणानंतर त्या जवळपास ७० टक्के काम करू लागतील. आरोग्याच्या दृष्टीने एवढे पुरेसे मानले जाते. 

लालूंचे धाकटे पुत्र व उपमुख्यमंत्री तेजस्वी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वडिलांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. वडील शुद्धीवर असून, बोलत आहेत. शुभेच्छांबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, असे तेजस्वी यांनी म्हटले आहे. मीसा भारतीनेही सोशल मीडियावर लिहिले की, वडील ठीक आहेत. 

‘तुमचे आरोग्य चांगले असणे हेच माझे जीवन’शस्त्रक्रियेपूर्वी रोहिणीने लालूंसोबतचा एक फोटो ट्वीट करून लिहिले की, रॉक अँड रोल करण्यासाठी तयार. माझ्यासाठी हे पुरेसे आहे. तुमचे आरोग्य चांगले असणे हेच जीवन आहे. शस्त्रक्रियेची प्रक्रिया ३ डिसेंबरपासून सुरू झाली होती. ही प्रक्रिया सुरू होण्याआधीही रोहिणीने ट्वीटवर भावनिक संदेश लिहिला होता. त्यात तिने म्हटले होते की, आम्ही ईश्वर पाहिलेला नाही. मात्र, आमच्या वडिलांमध्येच ईश्वराचे रूप पाहिले आहे.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव