धक्कादायक! सुनेची दहशत; सासूला जमिनीवर आदळली, पतीलाही मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 20:27 IST2025-04-04T20:26:53+5:302025-04-04T20:27:16+5:30
मध्य प्रदेशात एका सुनेने कुटुंबीयांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! सुनेची दहशत; सासूला जमिनीवर आदळली, पतीलाही मारहाण
गेल्या काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये एका पत्नीने प्रियकरासह आपल्याच पतीची हत्या केल्याची घटना समोर आली होती. तर दोन दिवसापूर्वी पत्नीने पतीला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता असाच एक व्हिडीओ मध्य प्रदेशातील समोर आली आहे, यामध्ये एका सुनेने आपल्याच सासूला मारहाण केल्याचे दिसत आहे.
हे प्रकरण मध्य प्रदेशातील शिंदे यांच्या छावणीतील आदर्श कॉलनीतील आहे. या घटनेपासून, पीडित वृद्ध महिला आणि तिचा मुलगा गेल्या चार दिवसांपासून तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात येत होते पण पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही. यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा इंदरगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण या तक्रारीमध्ये मारहणाचा उल्लेख नव्हता. किरकोळ कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'जीव देऊ, पण दुरुस्ती मान्य करणार नाही', वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटना रस्त्यावर
सासूला वृद्धाश्रमामध्ये ठेवण्यासाठी आगृह होता
सासू सरला बत्रा यांनी सांगितले की, त्यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. ती तिचा मुलगा विशाल बत्रा आणि सून नीलिका आणि मुलांसह राहते. सुनेला तिला घरात ठेवायचे नाही आणि ती मला वृद्धाश्रमात पाठवण्याची सुनेची इच्छा आहे. पण माझ्या मुलाला हे अजिबात मान्य नव्हते.
सून संपूर्ण मालमत्ता तिच्या नावावर करा अशी मागणी करत होती असंही सांगण्यात येत आहे. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद होतात. दुपारी २ वाजता सून तिच्या वृद्ध सासूला शिवीगाळ करत होती. घरात घडणाऱ्या क्षुल्लक गोष्टींवरून ती अनेकदा अशाच प्रकारची शिवीगाळ करायची. यावर त्यांच्या मुलाने त्यांच्या सुनेला थांबवले आणि सुनेनं तिच्या वडिलांना फोन केला. काही वेळाने, सुनेचे वडील सुरेंद्र कोहली, भाऊ नानक कोहली आणि इतर तीन ते चार मुले त्यांच्या घरी पोहोचले.
सुनेच्या वडिलांनी आणि भावाने घरात घुसून सरलाचा मुलगा विशाल याला शिवीगाळ केली आणि मारहाण केली. तिच्या मुलाला वाचवण्यासाठी आली तेव्हा सून नीलिमाने तिला बेदम मारहाण केली. त्यांनी सासूला जमिनीवर फेकले यामुळे मुक्का मार लागला. केस धरून ओढले,डोके भिंतीवर आपटले आणि मला चापटही मारली. यानंतर, पतीला त्यांनी रस्त्यावर नेऊन मारहाण केली, असंही सागंण्यात येत आहे.