चेन्नई- शहरातील एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने दारूच्या नशेत ड्युटीवर असणाऱ्या पोलीस हवालदाराला शिव्या दिल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही, तर तुम्हाला कामावरून काढून टाकायला लावीन, अशी धमकीही या मुलीने दिली. ड्युटीवर असणाऱ्या पोलीस हवालदाराने चेकिंग करत असताना मुलीची गाडी थांबविली. हवालदाराने गाडी थांबविल्यावर मुलगी त्यांच्याशी अरेवारी करत बोलायला लागली. मुलगी हुज्जत घालत असताना पोलिसांनी तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये मुलगी पोलीस हवलदाराला शिव्या देताना व धमकावताना दिसत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी चेन्नईतील कोस्टल सिक्युरिची ग्रुपचे अॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस तमिलसेल्वन यांची मुलगी आहे. सोमवारी (2 एप्रिल) रोजी तिला मरीना बीचजवळ नशेत गाडी चालवत असताना एका हवालदाराने पकडलं. गाडीमध्ये यावेळी तिच्याबरोबर इतर तीन जणंही होते.
दारूच्या नशेत गाडी चालवताना पकडल्यावर पोलिसांनी तिची गाणी तपासायची असल्याचं सांगितलं. तेव्हा गाडीतील सर्वांनी त्याला विरोध केला. त्यावर मुलीने त्या हवालदाराला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. इतकं होऊनही मुलगी व तिच्या साथीदारांनी त्या हवलदाराची तक्रार केली. याविषयी तमिलसेल्वन यांना विचारलं असता त्यांनी स्पष्टीकरण द्यायला नकार दिला.