केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत. थंडी, वाऱ्याची पर्वा न करता हे शेतकरी रस्त्यावर, ट्रॅक्टरखाली कुठे जागा मिळेत तिथे झोपत आहेत. याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशाच एका शेतकऱ्याला त्याच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलींनी टीव्हीवर थंडीत कुडकुडताना पाहिले आणि यानंतर काहीच दिवसांत तो शेतकरी थंडीपासून बचावासाठी इतरांना कपडे वाटताना दिसला.
दिल्ली-जयपूर हायवे 48च्या हरियाणा-राजस्थान सीमेवरील रेवाडी खेडा सीमेवर 15 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यामध्ये पंजाबच्या कपूरथलाच्या मकसूदपूरचे एक शेतकरी सरदार सतनाम सिंग हे देखील होते. वार्तांकन करताना टीव्ही रिपोर्टरच्या कॅमेरामध्ये सतनाम आले अन् त्याचवेळी त्यांच्या मुलींनी अमेरिकेत पाहिले. आपला बाप थंडीत कुडकुडतोय, त्याच्यासोबत असलेले शेतकऱ्यांच्या अंगावरही उबदार कपडे नाहीत. या विचाराने त्यांना धक्काच बसला.
Farmer Protest: कृषी कायद्यांवरून एनडीएला दुसरा धक्का; मोदींनी मित्रपक्ष गमावला
जेव्हा सतनाम शेतकऱ्यांना उबदार कपडे वाटत होते तेव्हा त्यांना हे कपडे कुठून आले हे विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी सांगितले की, हे कपडे त्यांच्या अमेरिकेत राहणाऱ्य़ा गुरप्रीत कौर आणि तलविंदर कौर यांनी पाठविले. त्यांनी टीव्हीवर मला थंडीमध्ये आंदोलनाला बसल्याचे पाहिले आणि 10 लाख रुपये किंमतीचे गरम कपडे पाठवून दिले.
घरच्या शेतीवरच शिक्षण घेऊन आम्ही अमेरिकेत येऊ शकलो. अशावेळी जेव्हा माझा शेतकरी बाप संकटात आहे तेव्हा आमचे त्यांना मदत करण्याचे कर्तव्य आहे., असे या मुलींनी सांगितले. सतनाम यांनी ट्रकभरून आलेले कपडे सर्व शेतकऱ्यांना वाटले. कारण आपल्यासोबत आलेल्या शेतकऱ्यांचा थंडीपासून बचाव व्हावा.
PM kissan: मोदी सरकारचेच आंदोलनाला फंडिंग; पंजाबच्या शेतकऱ्यांचा खळबळजनक आरोप
शेतीतील कामाईतूनच मुलींना अमेरिकेत पाठविले....सरदार सतनाम यांनी सांगितले की, शेतीतून झालेल्या कमाईमधूनच मुलींना अमेरिकेत पाठविले होते. आज दोन्ही मुली तिथे स्थिरस्थावर झाल्या आहेत. तिथून शेतकऱ्यांना लागेल ती मदत करणार आहेत. या मुलींनी कपड्यांसोबत साबन, तेलही पाठविले आहे. अशाच प्रकारची करोडोंची मदत शेतकऱ्यांना अमेरिकेतून मिळत आहे. परदेशात असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी ट्रकचे ट्रक भरून साहित्य, टॉयलेट, टेंट आदी वस्तू पाठविल्या आहेत.