शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

दाऊद करणार होता आत्मसमर्पण - नीरज कुमार यांचा गौप्यस्फोट

By admin | Published: May 02, 2015 11:45 AM

मुंबईतील १९९३ च्या साखळी बाँबस्फोटांचा सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा आत्मसमर्पण करण्यास तयार होता,असा गौप्यस्फोट सीबीआयचे माजी महानिरीक्षक नीरज कुमार यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - मुंबईतील १९९३ च्या साखळी बाँबस्फोटांचा सूत्रधार आणि अडंरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा आत्मसमर्पणण करण्यास तयार होता, त्यासाठी त्याने ती वेळा सीबीआयशी संपर्कही केला होता, असा गौप्यस्फोट  सीबीआयचे माजी महानिरीक्षक व दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त नीरज कुमार यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कुमार यांनी हा दावा केला असून सीबीआयच्या वरिष्ठ अधिका-यांनी नकार दिल्यामुळे दाऊदशी बोलणी फिस्कटली असेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बाँबस्फोट या प्रकरणाचा नीरज कुमार तपास करत होते. याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दाऊदनने जून १९९४मध्ये आत्मसमर्पण करण्याची तयारी दर्शवली होती, त्यासंदर्भात त्याच्याशी तीनवेळा चर्चाही झाली होती. मात्र सीबीआयने दाऊदच्या आत्मसमर्पणाला नकार दिला आणि बोलणी फिस्कटली, नाहीतर आज दाऊद मोकाट फिरत नसता असे कुमार यांनी सांगितले. 'दाऊद याप्रकरणी प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्यास तयार होता, मात्र भारतात आल्यानंतर इतर शत्रू आपला खात्मा करतील अशी भीती त्याला वाटत होती. तसेच शरण आल्यावर पलिसांकडून छळ होण्याची चिंताही त्याला सतावत होती' असे कुमार यांनी सांगितले. 'सीबीआय त्याच्या सुरक्षेची पूर्ण जबाबादारी घेईल' असे आश्वासन आपण दाऊदला दिल्याचेही कुमार यांनी सांगितले. मात्र सीबीआयच्या वरिष्ठ अधिका-यांनी आपल्याला थांबवले आणि पुढील बोलणी होऊ शकली नाहीत,  असे कुमार म्हणाले.
दरम्यान नीरज कुमार यांच्यापूर्वी ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनीही दाऊदने आपल्याला फोन केला होता व शरण येण्याबद्दल त्याचे व आपले बोलणे झाले होते, असा दावा केला होता.