शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

D कंपनीला अजमल कसाबची सुपारी मिळाली नव्हती, छोटा शकीलचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 12:49 PM

माजी आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेल्या राकेश मारिया यांनी आपल्या ‘लेट मी से इट नाऊ’ (Let me say it Now) या आत्मचरित्रात धक्कादायक खुलासे केले आहेत.

ठळक मुद्दे26/11च्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेल्या अजमल कसाबसंबंधी त्यांनी पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट केला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगला अजमल कसाबला कोठडीत मारण्याची सुपारी मिळाली होती. पोलिसांनी ही माहिती सार्वजनिक होऊ दिली नाही, असा उल्लेख राकेश मारियांनी पुस्तकात केला आहे. दाऊदचा हस्तक राहिलेल्या छोटा शकीलनं खुलासा केला आहे. D कंपनीला कसाबची सुपारी मिळाली नव्हती. पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी राकेश मारिया धादांत खोटं बोलत आहेत, असा दावा छोटा शकीलनं केला आहे.

नवी दिल्लीः माजी आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेल्या राकेश मारिया यांनी आपल्या ‘लेट मी से इट नाऊ’ (Let me say it Now) या आत्मचरित्रात धक्कादायक खुलासे केले आहेत. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेल्या अजमल कसाबसंबंधी त्यांनी पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट केला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगला अजमल कसाबला कोठडीत मारण्याची सुपारी मिळाली होती. पोलिसांनी ही माहिती सार्वजनिक होऊ दिली नाही, असा उल्लेख राकेश मारियांनी पुस्तकात केला आहे. त्यासंदर्भात आता दाऊदचा हस्तक राहिलेल्या छोटा शकीलनं खुलासा केला आहे. D कंपनीला कसाबची सुपारी मिळाली नव्हती. पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी राकेश मारिया धादांत खोटं बोलत आहेत, असा दावा छोटा शकीलनं केला आहे. News18 या वृत्तवाहिनीनं या संबंधीचं वृत्त दिले असून, छोटा शकीलनं त्यांच्याकडे हा खुलासा केला आहे. प्रसिद्धीसाठी त्यांनी मनाला वाट्टेल ते लिहिलं आहे. राकेश मारियांनी पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी खोट्या वृत्ताचा आधार घेतला आहे. प्रसिद्धीसाठी ते फक्त दाऊद इब्राहिमच्या नावाचा वापर करत आहेत. खरं तर डी गँगचा अजमल कसाबशी कोणताही संबंध नाही. डी गँगला कसाबच्या हत्येची कोणतीही सुपारी मिळालेली नव्हती. राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे की, कोठडीत कसाबला मारण्याची जबाबदारी डी गँगला मिळाली होती.

Rakesh Maria Book : "दाऊदने कसाबची सुपारी घेतलेली, पण त्याला जिवंत ठेवायचेच होते"

मारिया साहेबांच्या खोट्या विधानांसंदर्भात माझ्याकडे उत्तर नाही. जर ते भाईंच्या नावानं पुस्तकाचं प्रमोशन करत असतील तर गोष्ट वेगळी आहे. त्यांनी एखाद्या लहान मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की हे सर्व खरं आहे. जर त्यांनी असं केल्यास त्यावर विश्वास ठेवता येईल. परंतु ते तसं करणार नाहीत. ते खोट्या दावांनुसार बुक प्रमोट करत आहेत. मला यापुढे काहीही बोलायचं नाही. Sheena Bora Murder Case : मारियांचे पुस्तकी दावे 'त्या' पोलीस अधिकाऱ्याने फेटाळले; पुस्तक खपासाठी मार्केटिंग

Video : Sheena Bora Murder Case : खळबळजनक! राकेश मारियांनी पुस्तकातून केला गौप्यस्फोट

आज हिंदुस्थानात कोण खोटं बोलत नाही. खालपासून वरपर्यंत खोटंच बोललं जातं. सर्वच्या सर्व खोटारडे आहेत. तुम्हाला सगळंच माहिती आहे, तुम्ही मीडियावाले आहात. आता राकेश मारिया खोटं बोलले तर त्यात काय नवीन गोष्ट आहे. कसाब हा आमचा विषय नाही. त्यामुळे आम्हाला ISI किंवा इतर कोणीही आदेश देऊ शकत नाही. अजमल कसाबच्या कोणत्याही प्रकरणात दाऊद इब्राहिम किंवा डी कंपनीचा कोणताही संबंध नसल्याचंही छोटा शकीलनं स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :Rakesh Mariaराकेश मारियाChhota Shakeelछोटा शकील