शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

छोटा राजनला संपवण्याचा दाऊदचा कट पुन्हा फसला

By admin | Published: July 02, 2015 12:33 PM

अंडरवर्ल्डमधील डॉन छोटा राजन व दाऊद इब्राहिममधील युद्ध पुन्हा एकदा तापले असून वर्षाच्या सुरुवातीला दाऊदने छोटा राजनला मारण्याचा कट रचला होता.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २ -  अंडरवर्ल्डमधील डॉन छोटा राजन व दाऊद इब्राहिममधील युद्ध पुन्हा एकदा तापले असून वर्षाच्या सुरुवातीला दाऊदने छोटा राजनला मारण्याचा कट रचला होता. मात्र छोटा राजन तिथून पळ काढण्यात यशस्वी झाल्याने दाऊदचा प्रयत्न फसला. छोटा राजनच्या निकटवर्तीयाने दाऊदला राजनच्या ठावठिकाण्याची माहिती पुरवल्याचे स्पष्ट झाले आहे. 

छोटा राजन व दाऊद इब्राहिम यांच्यात कट्टर वैमनस्य असून १५ वर्षांपूर्वी दाऊदने बँकॉकमध्ये छोटा राजनवर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यातून राजन बचावला असला तरी अजूनही दाऊदच्या मनात राजनविषयी राग असल्याचे उघड झाले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेचे दाऊद व राजनच्या निकवर्तीयांच्या फोन कॉल्सवर नेहमीच लक्ष असते. यातील संभाषण भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली असून यामध्ये राजनच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले. कराचीतून भारतातील एका नंबरवर सर्वाधिक वेळा कॉल गेले होते. हिंदी व उर्दुत झालेल्या या संभाषणात दाऊदचा साथीदार छोटा शकीलने राजनच्या एका निकटवर्तीयाला फोडल्याचे स्पष्ट होते. त्या व्यक्तीला राजनची माहिती दिल्यास भरघोस पैसे देण्याचे आमीष देण्यात आले होते.  या संभाषणात शकील म्हणतो, आम्हाला वाईट ठरवून तो स्वतः देशभक्त म्हणून सगळीकडे फिरत आहे, गेल्या वेळी आमचा नेम थोडक्यात चुकणार नाही, यंदा त्याचा काटा काढूच. पॉवर आमच्याकडे आहे, तू आम्हाला साथ दिलीस तर आम्ही तुझी पूर्ण 'काळजी' घेऊ असे शकीलने त्या व्यक्तीला सांगितले. यानंतर त्या व्यक्तीने राजन ऑस्ट्रेलियातील न्यूकासल येथे लपून बसल्याचे सांगितले. 
राजनची माहिती मिळताच शकीलने एका शार्पशुटरला ऑस्ट्रेलियात पाठवलेही होते, मात्र याची कुणकुण लागल्याने राजनने तिथून अज्ञात स्थळी पळ काढला होता. राजन कुठे गेला याची माहिती कोणालाही नाही. गुप्तचर यंत्रणेच्या अधिका-यांनी या वृत्तावर अधिक भाष्य करणे टाळले आहे. मात्र दाऊदने राजनच्या हत्येचा कट रचला होता याला त्यांनी दुजोरा दिला.