शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

दाऊदच्या माणसाने केला त्याचाच 'गेम', 45 कोटी घेऊन छू-मंतर

By admin | Published: September 12, 2016 10:08 AM

अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत त्याच्याच माणसाने 'गेम' केली आहे.डॉनला त्याच्याच माणसाने करोडो रूपयांना चुना लावल्याचं समोर आलं आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.12- अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत त्याच्याच माणसाने 'गेम' केला आहे. स्वतःच्याच गॅंगवरील दाऊदची जरब आता कमी झाली आहे. त्याच कारण म्हणजे अंडरवर्ल्डच्या या डॉनला त्याच्याच माणसाने करोडो रूपयांना चुना लावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दाऊदची भीती आता त्याच्या माणसांनाही वाटत नसल्याचं दिसतंय. दाऊदचा सहकारी खलीक अहमद याने दाऊदला तब्बल 45 कोटी रूपयांना फसवलं असून तो सर्व पैशांसकट फरार झाला आहे. 
 
गुप्तचर यंत्रणेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  खलीक अहमदला दिल्लीच्या एका 'प्रतिष्ठित' व्यक्तिकडून 45 कोटींची रक्कम घ्यायची होती. यातील 40 कोटी हवालाद्वारे परदेशात पाठवायचे होते. या कामासाठी खलीकला 5 कोटी रूपये बक्षिस म्हणून मिळणार होते. मात्र, ४० कोटी दाऊदला न पाठवता संपूर्ण ४५ कोटी रुपये घेऊन खलीक गायब झाला आहे. गबन खुलासा, जाबिर मोती आणि खलीक अहमद यांचे फोन टॅप केल्यानंतर गुप्तचर विभागाला ही माहिती मिळाली. मोती हा पाकिस्तानातील दाऊदचा 'खास' माणूस आहे. तर अहमदचं भारत आणि शारजा दरम्यान सातत्याने येणंजाणं असतं.
मोतीने खलीकला फोनकरून दाऊदचा सहकारी रजत भाई याचं नाव घेऊन पैशांबाबत विचारणा केल्याचं समोर आलं आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार, दाऊदची दोन माणसं खलीकचा शोध घेत आहेत. खलीकला पकडण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 ला हे दोघे दिल्लीहून कॅनडालाही गेले होते. दाऊदसोबत फ्रॉड केल्यानंतर खलीक अहमद मणिपूरमध्ये लपल्याचे सांगितले जात आहे.