वाह रे पठ्ठ्या! बोहल्यावर चढला अन् थेट परीक्षा केंद्रात पोहोचला नवरदेव; वधूने कारमध्ये बसून पाहिली वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 04:55 PM2023-02-07T16:55:50+5:302023-02-07T16:56:22+5:30

उत्तराखंडमधील हरिद्वार येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

day after the wedding in Haridwar, Uttarakhand, the bridegroom appeared at the college to give his LLB paper  | वाह रे पठ्ठ्या! बोहल्यावर चढला अन् थेट परीक्षा केंद्रात पोहोचला नवरदेव; वधूने कारमध्ये बसून पाहिली वाट

वाह रे पठ्ठ्या! बोहल्यावर चढला अन् थेट परीक्षा केंद्रात पोहोचला नवरदेव; वधूने कारमध्ये बसून पाहिली वाट

googlenewsNext

हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वार येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे लग्न लागताच नवरदेवाने परीक्षेसाठी परीक्षा केंद्राकडे धाव घेतली. खरं तर हरिद्वार येथे लग्न लागल्यानंतर नवऱ्या मुलाने एलएलबीची परीक्षा देण्यासाठी महाविद्यालय गाठले. दुसरीकडे, त्याची बायको केंद्राबाहेर कारमध्ये बसून त्याची वाट पाहत राहिली. परीक्षा संपल्यानंतर नवरदेव जेव्हा बाहेर आला तेव्हा वधूच्या चेहऱ्यावर वेगळेच हास्य होते. या अनोख्या नवरदेवाची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

लग्न लागताच नवरदेवानं गाठलं परीक्षा केंद्र
दरम्यान, हरिद्वार श्यामपूर कांगरी गाजीवाला येथील रहिवासी असलेल्या तुलसी प्रसादचे काल हरयाणातील हिसार येथे लग्न झाले. आज त्याचा एलएलबीचा पेपर होता. पेपर असल्याने तुलसी लग्न झाल्यानंतर घरी न जाता थेट एलएलबीचा पेपर देण्यासाठी गेला. तुलसीप्रसाद यांने यासंदर्भात माहिती दिली. त्याने सांगितले की काल त्याचे हिसारमध्ये लग्न झाले होते, पण आज एलएलबीचा पेपर होता. पेपरही द्यायचा होता, तो थेट घरी गेला असता तर उशीर झाला असता. त्यामुळे पेपर देण्यासाठी तो थेट कॉलेजमध्ये आला. लग्नाचे विधी आता घरी जाऊन पूर्ण केले जाणार असल्याचे त्याने अधिक सांगितले. 

लॉ कॉलेजच्या प्राचार्य यांनी दिली माहिती 
पूर्णानंद तिवारी लॉ कॉलेजचे प्राचार्य अशोक कुमार तिवारी यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लग्नात पेपर देणाऱ्या विद्यार्थ्याचा एलएलबी 5 व्या सत्राचा पेपर होता. पेपर सोडला असता तर एक वर्ष वाया गेले असते. त्यामुळेच त्याने लग्नाच्या कपड्यांमध्येच पेपर देण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळेच लग्नानंतर तुलसीप्रसाद घरी न जाता थेट कॉलेजचा पेपर देण्यासाठी आला. नव्या आयुष्याची सुरुवात करताना त्याने पेपरला अधिक प्राधान्य दिले आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यासोबत वधूही आली, जी गाडीत आपल्या पतीची वाट पाहत राहिली.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: day after the wedding in Haridwar, Uttarakhand, the bridegroom appeared at the college to give his LLB paper 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.