तिब्बत: माउंट एव्हरेस्टच्या तुलनेत कैलास पर्वताची उंची 2 हजार मीटरने कमी आहे. एव्हरेस्टवर आतापर्यंत 700 गिर्यारोहकांनी चढाई केली आहे. पण, कैलास पर्वतावर आजपर्यंत कुणीच चढाई करू शकलेलं नाही. आम्ही तुमहाला सांगणार आहोत, यामागचे कारण.
अशी मान्यता आहे की, कैलास पर्वतावर स्वतः भगवान शंकर आपल्या कुटुंबासह राहतात. त्यामुळे कुठलाच मनुष्य जिवंतपणी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. पण, मृत्यूनंतर आणि आयुष्यात एकही पाप न केलेल्या व्यक्तीलाच कैलास पर्वतावर जाता येत. पुरातन कथेनुसार, अनेकदा राक्षस आणि नकारात्मक शक्तींना या पर्वताला भगवान शंकरापासून हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची इच्छा कधीच पूर्ण होऊ शकली नाही.
काहीजण असेही मानतात की, कैलास पर्वतावर चढाई करणारा काही अंतरावर गेल्यावर दिशाहीन होतो. दिशा माहित नसताना पर्वतावर चढाई करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखं आहे. त्यामुळे कुणीच आजपर्यंत कैलास पर्वतावर चढण्याचा विचार केलेला नाही. काही लोक असंही म्हणतात कैलासावर चढाई करणाऱ्या व्यक्तीचे आपोआप ह्रदय परिवर्त होते आणि तो परतीचा मार्ग पकडतो.
माउंट एव्हरेस्टवर चढणे सोपेकैलास पर्वतापेक्षा 29 हजार फूट उंच असलेल्या माउंट एव्हरेस्टवर चढणे तांत्रिकदृष्य सोपं आहे. पण, कैलास पर्वतावर सरळ रस्ता नसल्यामुळे आणि सर्वत्र हिमखंड असल्यामुळे चढाई करणे सोपं नाही. अशा मोठ-मोठ्या हिमखंडासमोर मोठ्यातमोठा गिर्यारोहकही हार मानेल. काही लोक म्हणतात की, कैलास पर्वतावर अशा काही शक्ती आहेत, ज्यामुळे मानसाचे शरीर आपोआप थकते आणि त्याच्या शरीरात वर चढण्याइतकी शक्ती राहत नाही.
1999 मध्ये काही रशियन वैज्ञानिकांच्या टीमने तिब्बतमध्ये दाखल होऊन एक महीने कैलास पर्वतावर अभ्यास केला होता. हे वैज्ञानिक म्हणाले होते की, या पर्वतावरील त्रिकोणी आकाराच्या बर्फाच्छादित टेकड्या नसून पिरॅमीड आहेत. यामुळे अनेकजण माउंट कैलासला शिव पिरामिडदेखील म्हणतात.