शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

मायावतींबद्दल अपशब्द वापरणा-या दयाशंकर सिंह ६ वर्षांसाठी भाजपातून निलंबित

By admin | Published: July 20, 2016 5:11 PM

बसपा प्रमुख मायावती यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरणा-या दयाशंकर सिंह याच्यावर भाजपने कडक कारवाई केली असून, त्यांना सर्व ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - बसपा प्रमुख मायावती यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरणा-या दयाशंकर सिंह यांच्यावर भाजपाने कडक कारवाई केली असून, त्यांना ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. ते उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष होते. त्यांनी मायावतींवर टीका करताना त्यांची तुलना शरीर विक्रय करणा-या महिलांबरोबर केली होती. 
 
या मुद्यावरून मायावती यांनी आज राज्यसभेत भाजपाला धारेवर धरताना दयाशंकर सिंह यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. दयाशंकर सिंह यांच्या विधानाबद्दल अरुण जेटली यांनीही खेद व्यक्त केला. दयाशंकर सिंह यांचे विधान कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मान्य नाही. दयाशंकर सिंह यांना आम्ही सर्व पदांवरुन हटवत आहोत, असे उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले. 
 
दयाशंकर सिंहच्या विधानावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. सर्वपक्षीयांनी त्यांच्या विधानाचा निषेध केला. मायावती पैसे घेऊन तिकिटं वाटत असल्याचा आरोप दयाशंकर सिंह यांनी केला आहे. 
 
सकाळी एक कोटी रुपये देणाऱ्याला तिकिट दिलं जातं, दुपारी एखादा दोन कोटी घेऊन आला, तर त्याला तिकिट दिलं जातं आणि संध्याकाळी तीन कोटी रुपये देणारा मिळाला तर आधीच्यांचे पत्ते कापून तिसऱ्याला तिकिट दिलं जातं, असं सिंह यांनी म्हटलं होतं.