दूरदर्शनअंतर्गत येणाऱ्या डीडी न्यूज या सरकारी चॅनलने आपल्या लोगोमध्ये केलेल्या बदलामुळे विरोधी पक्ष भडकले आहेत. डीडी न्यूजने नुकतेच अपल्या नव्या लोगोचे अनावरण केले. या लोगोचा रंग आधी लालसर होता. तो आता भगवा करण्यात आला आहे. यामुळे विरोध आक्रमक झाले आहेत. ब्रॉडकास्टरने या आकर्षक रंगांचा वापर हा चॅनेलच्या ब्रँडिंग आणि व्हिज्युअल सौंदर्याशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वीच हा बदल करण्यात आल्यानेही, विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.मंगळवारपासून करण्यात आला आहे बदल -डीडी न्यूजने मंगळवारी सायंकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हँडलवरून आपला नवा लोगो एका व्हिडिओ मेसेजसह पोस्ट केला होता. चॅनलने एक्सवर लिहिले होते, “आमचे मूल्य समान आहेत, आता आम्ही एका नव्या अवतारात ओलो आहोत. एका अशा वृत्त प्रवासासाठी तयार व्हा जी या पूर्वी कधीही बघितली नसेल. अगदी नव्या डीडी न्यूजचा अनुभव घ्या.” तसेच, “आमच्याकडे हे सांगण्याचे धैर्य आहे की, वेगापेक्षा अचूकता, दाव्यांपेक्षाही तथ्य आणि सनसनाटीपेक्षा सत्य. कारण हे डीडी न्यूजवर आहे, तर सत्य आहे! डीडी न्यूज – भरोसा सच का." असेही चॅनलने लिहिले आहे. TMC खासदार म्हणाले 'प्रचार भारती' -यासंदर्भात बोलताना, राज्यसभेतील TMC खासदार जवाहर सरकार म्हणाले, “नॅशनल ब्रॉडकास्टरने आपला ऐतिहासिक फ्लॅगशिप लोगो भगवा केला आहे. मी याचा माजी सीईओ म्हणून या भगवीकरणाकडे चिंतित होऊन बघत आहे आणि अनुभवत आहे. आता ही प्रसार भारती नही, तर प्रचार भारती आहे.'' जवाहर सरकार 2012 ते 2014 दरम्यान प्रसार भारतीचे सीईओ होते.
प्रसार भारतीच्या सीईओचं स्पष्टिकरण -लोगोमधील बदलानंतर इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी म्हणाले, नवीन लोगोमध्ये आकर्षक केशरी रंग आहे. काही महिन्यांपूर्वी, G-20 (समिट)पूर्वी, आम्ही DD India मध्ये सुधारणा केल्या होती आणि चॅनेलसाठी ग्राफिक्सच्या सेटवर निर्णय घेतला होता. आम्ही दृश्य आणि तांत्रिकदृष्ट्या डीडी न्यूजच्या पुनरुज्जीवनावर देखील काम करत आहोत.
लॉन्चिंग वेळीही भगवाच रंग होता -ते पुढे म्हणाले, "चमकत्या, आकर्षक रंगांचा वापर हा चॅनेलच्या ब्रँडिंग आणि व्हिज्युअल सौंदर्याशी संबंधित आहे. याचा काही वेगळा अर्थ काढणे दुर्देवी आहे. हा केवळ एक नवा लोगो नाही, तर संपूर्ण स्वरूप अपग्रेड करण्यात आले आहे. तसेच, 1959 मध्ये जेव्हा दूरदर्शन सुरू झाले, तेव्हा त्यावर भगवा लोगोच होता. यानंतर लोगोसाठी निळा, पिवळा आणि लाल असे रंगही वापरण्यात आले आहेत.