शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

डीडीसीए घोटाळा; सीबीआय चौकशी करा!

By admin | Published: December 29, 2015 2:54 AM

डीडीसीएत घोटाळा झालाच नसल्याचे एसएफआयओ चौकशीमध्ये आढळून आल्याचा भाजपचा दावा पक्षाचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी फेटाळून लावला आहे. सीबीआय किंवा

नवी दिल्ली : डीडीसीएत घोटाळा झालाच नसल्याचे एसएफआयओ चौकशीमध्ये आढळून आल्याचा भाजपचा दावा पक्षाचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी फेटाळून लावला आहे. सीबीआय किंवा ईडीसारख्या केंद्रीय तपास संस्थांकडून या डीडीसीए घोटाळ्याची सर्वंकष चौकशी करण्याची मागणी आझाद यांनी केली.आझाद सोमवारी पत्रकारांशी बोलत होते. एसएफआयओने (सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन आॅफीस) केवळ त्यांना देण्यात आलेल्या कागदपत्रांचाच तपास केला. कोट्यवधी रुपये देण्यात आलेल्या कंपन्या आजही अस्तित्वात आहेत की नाही याचा तपास एसएफआयओने केला नाही, असे आझाद यांनी सांगितले. आपण वित्तमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य करीत नव्हतो तर या घोटाळ्यात आपल्याला काँगेस नेत्यांना ओढायचे होते, असे स्पष्ट करून आझाद म्हणाले, संपुआ सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, कारण राजीव शुक्ला, नवीन जिंदाल आणि अरविंदसिंग लवली यांच्यासारखे सरकारचे अनेक नियुक्त सदस्य डीडीसीएचे संचालक म्हणून काम करीत होते आणि त्यांनी आपल्या कर्तव्यात बेजबाबदारपणा आणि गैरप्रकार केले. ‘काहीही परिश्रम न करता बनावट पत्ता असलेल्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये स्थानांतरित करण्यात आले. हा फार मोठा घोटाळा आहे कारण एकाच व्यक्तीला एकाच कामासाठी पुन्हा पुन्हा पैसे देण्यात आले. मजजवळ त्याचे पुरावे आहेत. माझा हा लढा क्रीडा संस्थांमधील भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. माझा लढा जेटलींविरुद्ध नाही,‘ असे आझाद यांनी स्पष्ट केले. जेटली यांच्याविरुद्ध आरोप केल्याबद्दल भाजपाने आझाद यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट करताना आझाद म्हणाले, ‘भाजपा किंवा जेटली यांना माझा विरोध नाही. मी जेटली यांना केव्हा आणि कुठे लक्ष्य बनविले हे मला अद्याप समजलेले नाही. मी भाजपाविरुद्ध काहीही बोललो नाही. मी पक्षाचा निष्ठावान सैनिक राहिलो आहे. परंतु मी भ्रष्टाचाराविरुद्ध मात्र लढत राहणार. डीडीसीएमधील गैरप्रकाराची सीबीआय आणि ईडी व डीआरआयसारख्या तपास संस्थांकडून चौकशी करण्यात आली पाहिजे.’आझाद यांनी अनेक कंपन्यांची नावे सांगितले. या कंपन्या कोट्यवधी रुपये खिशात घालत असून त्यांचे डीडीसीए अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे आहे, असा आरोप त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)अरविंद केजरीवाल जेटलींना क्लीन चिट नाही डीडीसीए घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या समितीने वित्तमंत्री अरुण जेटली किंवा अन्य कुणालाही अद्याप क्लीन चिट दिलेली नाही. जेटलींना क्लीन चिट देण्यात आल्याचा भाजपचा दावा फुसका आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.जेटलींना क्लीन चिट देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना लक्ष्य केल्याबद्दल माफी मागणार नाही. भाजप माफीसाठी भीक मागत आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. अबु्रनुकसानीच्या खटल्यात जेटलींना उलटतपासणीला सामोरे जाऊ द्या, मग पाहू,’ असे टिष्ट्वट केजरीवाल यांनी केले.सिसोदियांचा सवाल : जेटलींना निर्दोष ठरविण्याची घाई का?उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी डीडीसीए घोटाळ्याबाबत भाजपा आणि जेटली यांना पाच प्रश्न विचारले आहेत. जेटली आणि भाजपा चौकशीपासून पळ का बरे काढत आहे, असा सवालही सिसोदिया यांनी केला. ‘आमच्या चौकशी समितीने या अहवालात कुणाचेही नाव घेतलेले नाही. याचा अर्थ जेटली अध्यक्ष असतानाच्या काळात भ्रष्टाचार घडलाच नाही असे म्हणता येत नाही. जेटलींना निर्दोष ठरविण्यात एवढी घाई का? एवढा दबाव कशासाठी? चौकशी समितीने कालच चौकशीला प्रारंभ केला आहे,’ असे सिसोदिया म्हणाले.भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्नभ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे किंवा काय, अशी शंकाही आझाद यांनी उपस्थित केली. ‘सीबीआयने छापा घालण्याऐवजी डीडीसीएला फक्त नोटीस बजावल्या आणि आरोपींना पुरावे नष्ट करण्याची संधी दिली. मी ९० टक्के चौकशी केलेली आहे.सीबीआय माझ्याकडून पुरावे घेऊ शकते. पण सीबीआय मंद गतीने का काम करीत आहे हे कळत नाही. जेटली अध्यक्ष असताना आर्थिक गैरप्रकारांबाबत मी आणि इतरांनी त्यांना किमान २०० पत्रे लिहिली होती, असे आझाद म्हणाले.