भारत आणि इस्त्रायलच्या डिफेन्स सेक्टरमध्ये आपली ताकद वाढविण्यासाठी मोठे यश मिळाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मीडियम रेंज सर्फेस टू सर्फेस (MRSAM)च्या पहिल्या युनिटला जैसलमेरच्या हवाई दलाच्या ताफ्यात सहभागी केले. (IAF gets MRSAM a game changer in the air-defence system)
हे मिसाईल 70 किमीच्या परिघात दुष्मनाला मारण्यात सक्षम आहे. सिस्टिममध्ये अॅडव्हान्स रडार, कमांड अँड कंट्रोल, मोबाईल लॉन्चर आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकरसोबत इंटरसेप्टरदेखील आहे. हे मिसाईल डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) आणि इस्त्रायलच्या IAI ने सोबत मिळून तयार केले आहे. यामध्ये भारत आणि इस्त्रायलच्या अन्य डिफेन्स कंपन्यादेखील सहभागी होत्या. MRSAM ला भारताची तिन्ही सैन्य दले तसेच इस्त्रायलदेखील वापरणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, हवाई दलाला MRSAM देण्यासोबतच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारतच्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने मोठी झेप घेतली आहे. ही एअर डिफेन्स सिस्टिमसाठी गेम चेंजर असेल.
MRSAM सिस्टिमद्वारे लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, युएव्ही, सब सोनिक आणि सुपरसोनिक क्रूझ मिसाईल उद्ध्वस्त केले जाऊ शकतात. हे मिसाईल 70 किमीच्या परिघात येणाऱे अनेक टार्गेट उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे. हे मिसाई स्वदेशी तंत्रज्ञानाने आधारलेल्या रॉकेट मोटरच्या मदतीने संचलित होते.
मिसाईलच्या फायरिंग युनिटमध्ये कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टिम (CMS), मोबाईल लाँचर सिस्टिम (MLS), अॅडव्हान्स लाँग रेंज रडार, मोबाईल पॉवर सिस्टिम (MPS), रडार पॉवर सिस्टम (RPS), रीलोडर व्हेईकल (RV) आणि फिल्ड सर्विहस व्हेईकल (FSV) सहभागी आहेत.