शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

अवकाशकन्या कल्पना चावलाचा आज स्मृतीदिन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 9:05 AM

अंतराळात प्रवास करणारी पहिली भारतीय महिला आणि देशातील कोट्यवधी मुलींचे प्रेरणास्थान असलेल्या कल्पना चावला यांचा आज स्मृतीदिन आहे

नवी दिल्ली - अंतराळात प्रवास करणारी पहिली भारतीय महिला आणि देशातील कोट्यवधी मुलींचे प्रेरणास्थान असलेल्या कल्पना चावला यांचा आज स्मृतीदिन आहे. कल्पनाने न केवळ अंतराळ विश्वात यश मिळवलं होतं तर तिनं तमाम विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्वप्न जगायला लावणं शिकवलं, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्याची प्रेरणा दिली. या अवकाशपरीने वयाच्या 41व्या वर्षी पहिली अंतराळ यात्रा केली आणि दुर्देवानं ती कल्पनासाठी अखेरची ठरली. 'मी अंतराळ विश्वासाठी जन्मले आहे. प्रत्येक क्षण मी या विश्वासाठीच घालवला आहे आणि या विश्वासाठीच मी मरणार', तिचे हे वाक्य अखेर खरे ठरले.  घरात सर्वात लहान होती कल्पनाहरियाणातील कर्नाल येथे 17 मार्च 1962 साली कल्पनाचा जन्म झाला. बनारसीलाल चावला आणि संज्योती हे तिचे आईवडील. चार भावंडांमध्ये कल्पना सर्वात लहान. घरातील सर्व मंडळी लाडाने तिला 'मॉन्टो' म्हणून हाक मारायचे. कल्पनाचे शालेय शिक्षण कर्नालमधील टागोर बाल निकेतन विद्यालयमध्ये झाले. इयत्ता आठवीमध्ये असताना तिने आईवडिलांकडे इंजिनिअर बनण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, कल्पनाने डॉक्टर किंवा शिक्षिका व्हावं, असे वडिलांना वाटायचे. लहानपणापासून कल्पनाला अंतराळयान आकाशात कसं झेपावते, स्थिरावते?,  मी अंतराळयानातून उडू शकते का?, असे प्रश्न पडायचे. पण तिचे वडील हसून या गोष्टी टाळायचे, असे कल्पनाचे नातेवाईक सांगतात.  अपयशाला घाबरली नाही  'कल्पना आळशी नव्हती ती एका योद्धाप्रमाणे होती. अपयशाला न घाबरता जे मनात ठरवलं आहे त पूर्ण करायचंच, असा तिचा स्वभाव होता', असे तिच्या वडिलांना सांगितले.  शालेय शिक्षणानंतर कल्पना पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून 1982 साली पदवीधर झाली. यानंतर 1984 साली अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये तिने पुढील शिक्षण घेतले.कल्पनाला कविता, डान्स करणे, सायकलिंग आणि रनिंग करणे आवडायचे. स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये ती नेहमी धावण्याच्या शर्यती जिंकायची. ती नेहमी मुलांबरोबर बॅडमिंटन आणि डॉजबॉलही खेळायची. कल्पना चावला या सर्टिफाइड कमर्शिअल पायलट होती. तिच्याकडे सीप्लेन, मल्टी इंजिन एअर प्लेस आणि ग्लायडर चालवण्याचा परवाना होता. ग्लायडर आणि एअरोप्लेनसाठी ती सर्टिफाइड फ्लाइट इन्स्ट्रक्टरही होती. 1991 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर कल्पनाने नासामध्ये अॅस्ट्रोनॉट कॉर्प्सचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला होता.  नासाच्या अंतराळवीर समूहात निवड  1995 साली कल्पना यांची नासाच्या अंतराळीवर समूहात निवड झाली. 1998 मध्ये कल्पनाला तिच्या पहिल्या उड्डाणासाठी निवडण्यात आले. विशेष म्हणजे, अंतराळात झेपावणारी कल्पना पहिली भारतीय महिला होती.  मिशन विशेषज्ञ म्हणून तिनं एसटीएस-87 वर काम केले. अवकाशात तिनं 376 तास व 34 मिनिटे प्रवास केला. 1 फेब्रुवारी 2003  काळा दिवसयानंतर 1 फेब्रुवारी 2003 या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्‍या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांच्यासह 6  अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कल्पना चावला यांच्या सन्मानार्थ देशात अनेक योजना सुरू करण्यात आल्या. हरियाणा सरकारने कर्नालमध्ये सरकारी हॉस्पिटलचे नाव 'कल्पना चावला मेडिकल कॉलेज' ठेवले.   दरम्यान, अंतराळक्षेत्रातील योगदानासाठी कल्पनाला अनेक पुरस्कार मिळाले होते. स्पेस मेडल ऑफ ऑनर, नासा स्पेस फ्लाइट मेडल आणि नासा डिस्टींग्वीश्ड सर्व्हीस मेडल यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता.