ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 4 - तेलंगणामध्ये विजेच्या खांबावर चढलेल्या एका बिबट्याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निजामाबाद जिल्ह्यातील मल्लराम वनक्षेत्रामध्ये ही घटना आहे. मात्र, बिबट्या विजेच्या खांबावर नेमका चढलाच कसा? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. सोमवारी (3 जुलै) ही घटना घडली आहे.
याबाबत सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. हा बिबट्या मानवी वसाहतीत शिरल्याची माहिती स्थानिकांनी तातडीनं वन अधिका-यांना दिली. यानंतर हा बिबट्या विजेच्या खांबावर तारांमध्ये लोंबकळत असल्याचे निदर्शनास आले.
वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव येऊन बिबट्याला तारांवरून खाली उतरवले. पण त्यापूर्वीच हा बिबट्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.
भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या शिकार पकडण्यासाठी खांबावर चढला असावा, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, हा बिबट्या शहरी परिसरात कसा आला?, कोणत्या रस्त्याने आला?, येथे कसा शिरला? या सर्व बाजूंनी प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचंही अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वनविभागाचे अधिकारी पोहोचण्यापूर्वी घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील लोकं मोठ्या प्रमाणात तेथे जमले होते.
Telangana: A leopard died due to electrocution after he climbed an electric pole in Nizamabad district"s Mallaram forest area, yesterday pic.twitter.com/d2QBKTiNxM— ANI (@ANI_news) July 4, 2017