शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
5
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
6
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
7
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
8
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
9
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
10
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
11
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
12
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
13
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
14
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
15
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
16
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
17
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
18
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
19
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
20
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 6:06 PM

Rahul Gandhi Agniveer News: नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये दोन अग्निवीरांचा प्रशिक्षण सुरू असताना झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. या घटनेवरून राहुल गांधी भाजपा काही सवाल केले आहेत.

Rahul Gandhi Agniveer Tweet: प्रशिक्षण सुरू असताना तोफेचा बॉम्बगोळा फुटला आणि या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला. नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये ही घटना घडली. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा सरकार पुन्हा एकदा अग्निवीर योजनेवरून घेरले आहे.  

गोहिल विश्वराज सिंग (वय २०) आणि सैफत शीत (वय २१) अशी दोन्ही अग्निवीरांची नावे आहेत. त्याच्या मृत्युबद्दल राहुल गांधींनी शोक व्यक्त केला. 'नाशिकमध्ये प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निवीर गोहिल विश्वराज सिंग आणि सैफत शीत यांचं निधन वेदनादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे", असे राहुल गांधी  म्हणाले. 

"या घटनेने पुन्हा एकदा अग्निवीर योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यांची उत्तर देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. गोहिल आणि सैफतच्या कुटुंबीयांना वेळेवर भरपाई मिळेल का, जी कोणत्याही शहीद जवानाला दिली जाते इतकी असेल?", असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. 

"जवान शहीद झाल्यावर भेदभाव का?"

राहुल गांधी पुढे म्हणाले की, "अग्निवीरांच्या कुटुंबीयांना पेन्शन आणि अन्य सरकारी सुविधांचा लाभ का मिळणार नाही? जर दोन्ही सैनिकांच्या जबाबदाऱ्या आणि बलिदान समान आहे, तर ते शहीद झाल्यानंतर हा भेदभाव का", असा प्रश्न राहुल गांधींनी भाजपा सरकारला केला आहे.

पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे -राहुल गांधी 

"अग्निपथ योजना लष्करासोबत अन्याय आणि आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. एका जवानाचे आयुष्य दुसऱ्या जवानापेक्षा अधिक मूल्यवान आहे का, याचं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे", असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि राजनाथ सिंह यांना घेरले.

"या, मिळून या अन्यायाविरोधात उभे राहूयात. भाजपा सरकारची अग्रिवीर योजना हटवण्यासाठी, देशातील तरुणांचं आणि लष्कराचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आमच्या जय जवान आंदोलनात आजच सहभागी व्हा", असे आवाहनही राहुल गांधींनी केलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीAgneepath Schemeअग्निपथ योजनाcongressकाँग्रेसBJPभाजपा