नवी दिल्ली: विरारमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सफाई करीत असताना गुदमरून चार कामगारांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकार व पोलिस महासंचालकांना स्युओमोटो नोटीस बजावली आहे.
आयोगाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चारआठवड्यांत स्थितीदर्शक अहवाल सादर करा. घातक सफाई कामाबाबत काळजी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच मानवाधिकार आयोगाचे सल्लापत्र यांच्या अंमलबजावणीबाबत काय कार्यवाही करण्यात आली याचा समावेश अहवालात असायला हवा, असे आयोगाने म्हटले आहे.