अपघातातील गंभीर जखमी महिलेचा मृत्यू
By admin | Published: August 25, 2015 10:23 PM
नाशिक : म्हसरूळ येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोरील दुचाकी अपघातातील गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या महिलेचे नाव छाया रवींद्र खांदवे (२४) असे असून, त्या दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील रहिवासी होत्या़ गुरु वारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास दिगंबर एकनाथ खांदवे यांच्यासमवेत दुचाकीने (एमएच १५ एएल ५०१८) जात असताना त्यांची दुचाकी स्लीप झाली होती़ यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले होते़ दरम्यान, खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना छाया खांदवे यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, या अपघाताची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)