कोची दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, केरळमध्ये हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 01:18 PM2023-04-22T13:18:03+5:302023-04-22T13:18:38+5:30

PM Modi Death Threat: पत्र पाठवणाऱ्याच्या घरी पोलीस पोहोचले तेव्हा...

Death threat to Prime Minister Narendra Modi ahead of Kochi visit high alert in Kerala | कोची दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, केरळमध्ये हाय अलर्ट

कोची दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, केरळमध्ये हाय अलर्ट

googlenewsNext

PM Modi Death Threat: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्यापूर्वी एक धमकीचे पत्र आले आहे. यानंतर केरळला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पत्र पाठवणाऱ्याने २४ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या कोची दौऱ्यादरम्यान आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या पत्रात पाठवणाऱ्याचे नाव आणि पत्ता लिहिला आहे. त्यानंतर लगेचच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले ज्याचे नाव पत्रात लिहिले होते. जेव्हा पोलिस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तो घाबरला आणि त्याने सर्व आरोप फेटाळून लावले. मला अडकवण्यासाठी कोणीतरी पत्रावर माझे नाव लिहिल्याचे त्यांनी सांगितले. मला हे देखील माहित नाही की हे प्रकरण काय आहे? असेही तो म्हणाला.

घडलेल्या प्रकारानंतर केरळमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानके आणि विमानतळांवरही तपासणी वाढली आहे. या दरम्यान, सुरक्षेबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालकांचे पत्रही माध्यमांमध्ये आले. ADGP च्या पत्रात बॅन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या धमकीसह अनेक गंभीर धमक्या आहेत. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री ए मुरलीधरन यांनी पत्र लीक झाल्याबद्दल राज्य पोलिसांची उदासीनता जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे कार्यक्रम वेळेवर होतील. मोदी २४ एप्रिल रोजी कोचीला पोहोचतील आणि तिरुअनंतपुरम येथे राज्याला पहिली वंदे भारत एक्सप्रेस भेट देतील.

रोड शो देखील होणारच! सर्व एजन्सी अलर्ट मोडवर...

PM मोदी २४ तारखेला केरळला पोहोचणार आहेत. तेथे ते रोड शो करणार असून जाहीर सभेला संबोधितही करणार आहेत. केरळ भाजपला पंतप्रधानांच्या या भेटीकडून मोठ्या आशा आहेत. पक्ष दक्षिण भारतात आपले कॅडर वाढवत आहे. पीएम मोदींच्या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोक पोहोचतील. हे पाहता आता हे धमकीचे पत्र मिळणे ही चिंतेची बाब आहे. जरी या पत्राबाबत विचित्र बाबी समोर येत असल्या तरीही या पत्राबाबत सर्व एजन्सी अलर्ट मोडवर आहेत.

Web Title: Death threat to Prime Minister Narendra Modi ahead of Kochi visit high alert in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.