नवी दिल्ली - कोरोनानं देशात थैमान घातलेलं असून, राज्याला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत कपात होत असल्याचं चित्र दिसत असतानाच आज अचानक १०,३२० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या १ लाख ५० हजार ६६२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तर, महाराष्ट्रातील मृत्यूदरही सर्वाधिक असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. आता, एका अहवालनानुसार देशात एका तासाला 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.
देशामध्ये पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळल्याचा प्रकार गुरुवारी घडला. ही आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १५ लाख ८३ हजारपेक्षा जास्त झाली आहे. तर, या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १० लाखांवर गेली आहे. देशभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३४,९६८ झाली आहे. दिल्लीमध्ये ३९०७, तमिळनाडूमध्ये ३७४१, गुजरातमध्ये २१४७, उत्तर प्रदेशमध्ये १५३०, पश्चिम बंगालमध्ये १४९०, आंध्र प्रदेशमध्ये १,२१३, मध्य प्रदेशमध्ये ८४३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मरण पावलेल्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक लोकांना एकाहून जास्त व्याधी होत्या.
भारताने कोरोना मृत्यूंच्या संख्येत आता इटलीलाही मागे टाकले आहे, कोरोना महामारीने मृत्युमुखी पडलेल्या देशांमधील आकडेवारीत सध्या भारताचा 5 वा क्रमांक लागतो. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार देशात 31 जुलैपर्यंत 35,747 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी, जवळपास 18 हजार मृत्यू हे जुलैच्या 1 महिन्यात झाले आहेत. याहीपेक्षा कमी मुल्यांकन करायचे झाल्या, भारतात दिवसाला 600 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून प्रत्येक तासाल 25 रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून 32 दिवसाला मृतांचा आकडा दुप्पट होत आहे. हीच परिस्थिती राहिल्यास भारत ऑगस्ट महिन्यातील दोन आठवड्यांत 46 हजार मृतांची नोंद असलेल्या इंग्लंडच्याजवळ पोहोचेल.
दरम्यान, आज राज्यात कोरोनाचे आज ७५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार १५८ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के आहे. तर राज्यात २१ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या झाल्याचंही आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं आहे.