मंत्र्यांच्या वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
नाशिक : घोटी-शिर्डी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. केसरकर यांना आणण्यासाठी त्यांचे शासकीय वाहन औरंगाबादला चालले होते.
नाशिक : घोटी-शिर्डी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. केसरकर यांना आणण्यासाठी त्यांचे शासकीय वाहन औरंगाबादला चालले होते.घोटी शहरात पाव विक्र ीचा व्यवसाय करणारे उमर फारूक शेख (४०) शुक्रवारी घोटी - शिर्डी रस्त्याने दुचाकीवरून घोटीला येत असताना धामनी गावाजवळ त्याच्या मोटारसायकलला वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या शासकीय वाहनाने धडक दिली होती. अपघातात उमर शेख गाडीवरून फेकला गेले. त्यांच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याने त्यांना नाशिकच्या खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घोटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून चालक बाळ आमले यास अटक केली आहे. शेख यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. (प्रतिनिधी)