लखनौ : सहारनपूर दंगलीतील पप्पू नामक मुख्य आरोपीसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे छायाचित्र झळकल्याने नवा वाद निर्माण झाला आह़े राज्य सरकारने मात्र हा वाद निर्थक व तथ्यहीन असल्याचे सांगत हे सर्व जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न असल्याचे म्हटले आह़े
एका हिंदी वृत्तवाहिनीवर हे छायाचित्र झळकले आह़े सोशल नेटवर्किग साईटवरील समाजवादी पक्षाच्याच एका नेत्याच्या अकाऊंटवरून हे छायाचित्र घेण्यात आले असून ते एप्रिलमधील असल्याचा दावा संबंधित वृत्तवाहिनीने केला आह़े या छायाचित्रत मुख्यमंत्री अखिलेश यांच्यासोबत पप्पू उभा असलेला दिसत आह़े पप्पू सध्या अटकेत आह़े
गत 26 जुलैला सहारनपूरच्या कुतुबशेर भागात जमिनीच्या वादातून दोन समुदायात हिंसक संघर्षाला तोंड फुटले होत़े यानंतर या हिंसाचाराचे लोण पसरत त्यात 3 ठार तर 33 जण जखमी झाले होत़े संबंधित छायाचित्र जारी होताच, उत्तर प्रदेश सरकारवर टीकेचा भडीमार सुरू झाला़ यानंतर आज शनिवारी उत्तर प्रदेश सरकारला खुलासा करावा लागला़ सहारनपूर दंगलीतील एका आरोपीसोबतचे छायाचित्र आणि त्यासंबंधीचे वृत्त भ्रामक व निराधार असून राज्य सरकारची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न आह़े अशा वृत्ताद्वारे जनतेची दिशाभूल केली जात आहे, असे उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्त्याने स्पष्ट केल़े
(वृत्तसंस्था)