मोदी सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर उद्या चर्चा; राहुल गांधी काय बोलणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 04:50 PM2023-08-07T16:50:15+5:302023-08-07T16:51:14+5:30
राहुल गांधी आज लोकसभेच्या अधिवेशनात देखील सहभागी झाले.
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचनाही लोकसभा सचिवालयाने जारी केली आहे. मोदी आडनाव बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राहुल गांधी यांची दोन वर्षांची शिक्षा आणि शिक्षा रद्द केली. त्यामुळे त्यांचा संसदेच्या पुनर्स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळाल्याने काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
The decision to reinstate Shri @RahulGandhi as an MP is a welcome step.
— Mallikarjun Kharge (@kharge) August 7, 2023
It brings relief to the people of India, and especially to Wayanad.
Whatever time is left of their tenure, BJP and Modi Govt should utilise that by concentrating on actual governance rather than… pic.twitter.com/kikcZqfFvn
राहुल गांधी आज सकाळी संसद परिसरात दाखल झाले. यावेळी काँग्रसच्या खासदारांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राहुल गांधी आज लोकसभेच्या अधिवेशनात देखील सहभागी झाले. उद्या मोदी सरकारच्या विरोधात आणलेल्या काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावावर सभागृहात चर्चा होणार आहे. या चर्चेत राहुल गांधी देखील सहभागी होणार असून ते नेमके काय बोलणार?, कोणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील ट्विट करत जनतेच्या खऱ्या समस्येचा आवाज पुन्हा एकदा सभागृहात घुमणार, असं म्हटलं आहे.
देश की जनता के असल मुद्दों की आवाज एक बार फिर संसद में गूँजेगी।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 7, 2023
श्री @RahulGandhi जी के साथ कंधे से कंधा मिलाकर संघर्ष करने वाले लाखों कांग्रेस कार्यकर्ताओं व इन्साफ और सच की लड़ाई में समर्थन देने वाले करोड़ों देशवासियों का तहे दिल से धन्यवाद । pic.twitter.com/2HpWOWqY1u
दरम्यान, कमाल शिक्षेमुळे राहुल गांधी लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदींच्या कक्षेत आले. जर शिक्षा एका दिवसाने कमी असती, तरी तरतुदी लागू झाल्या नसत्या. अपिलीय न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दोषसिद्धीवरील स्थगिती बाजूला ठेवण्यासाठी बरीच पृष्ठे खर्ची घातली. मात्र, त्यांच्याही आदेशात या पैलूंचा विचार केला गेला नाही. राहुल गांधींना दोषी ठरविण्यात आले आणि त्यानंतर संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवले गेल्याने केवळ सार्वजनिक जीवनात राहण्याच्या त्यांच्या अधिकारावरच गदा आली नाही, तर ज्यांनी त्यांना आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले होते, त्या मतदारांच्या हक्कावरही परिणाम झाला.