मुंबई : चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत ३0 डिसेंबरला संपत असली तरी बँका आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील मर्यादा त्यापुढेही आणखी काही काळ सुरू राहील, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी केले आहे.पैसे काढण्यावरील मर्यादा लवकर उठविली जाईल का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, काळाबरोबर मर्यादा शिथिल होत जाईल. लोकांनी बँकांत गर्दी करावी, असे कोणालाही वाटत नाही. मर्यादा हळूहळू कमी होत जाईल. पण एकदम उद्याच ती संपूर्ण काढली जाईल, असे नव्हे. सध्याच्या निर्देशांनुसार एक ग्राहक आठवड्याला २४ हजार रुपये बँकेतून काढू शकतो. तसेच एटीएममधून २,५00 रुपये काढू शकतो. ही मर्यादा कधी हटविली जाईल, याबाबत रिझर्व्ह बँकेने काहीही जाहीर केलेले नाही. ३0 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा लोकांना बँकांत जमा करता येतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बँकेतून पैसे काढण्यावर डिसेंबरनंतरही मर्यादा !
By admin | Published: December 23, 2016 1:58 AM